दिग्दर्शक भावांची यशोगाथा
By Admin | Updated: December 9, 2015 00:48 IST2015-12-09T00:48:19+5:302015-12-09T00:48:19+5:30
बॉलीवूडमध्ये दोन भाऊ अभिनेता म्हणून चित्रपटात आले. त्यातील काही फ्लॉप झाले, तर काही हिट राहिले, परंतु आज चर्चा करू या त्या भावांची जे अभिनयाच्या नाही,

दिग्दर्शक भावांची यशोगाथा
बॉलीवूडमध्ये दोन भाऊ अभिनेता म्हणून चित्रपटात आले. त्यातील काही फ्लॉप झाले, तर काही हिट राहिले, परंतु आज चर्चा करू या त्या भावांची जे अभिनयाच्या नाही, तर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आले. येथेही काहींचे नशीब चमकले, तर काहींना अपयश आले.
या यादीत महत्त्वाचे नाव आहे चोपडा बांधवांचे, म्हणजेच बीआर चोपडा आणि यश चोपडा यांचे. बीआर यांनी आपल्या लहान भावाला निर्देशनात पहिली संधी दिली आणि नंतर यश चोपडांनी वेगळे होऊन स्वत:चे यशराज फिल्म्स बॅनर सुरू केले. बघता बघता यश चोपडादेखील पुढे गेले. बीआर आणि यश चोपडा भाऊ तर होतेच. मात्र, चित्रपटांच्याबाबतीत दोघांचे विचार वेगळे होते. बीआरने आपल्या चित्रपटात नेहमी सामाजिक गोष्टींना महत्त्व दिले. मात्र, यश यांनी मनोरंजनाला प्राधान्य दिले. यशाच्या बाबतीत दोन्ही भावांनी शिखर गाठले. यशाबाबत सांगायचे झाले, तर बीआर आणि यश चोपडासारखे यश क्वचितच काही भावांच्या जोडीला मिळाले असेल. या यादीत फिरोज आणि संजय खान यांचेही नाव आहे. दोघे अभिनय आणि नंतर निर्देशनाच्या मैदानात आले. फिरोज खान आपल्या स्टाईलने निर्देशक क्षेत्रात यश मिळवत गेले. त्या मानाने संजय खूप मागे राहिले. काला धंधा गोरे लोग और अब्दुल्ला सारख्या चित्रपटाच्या अपयशाने संजय खानला निर्देशक म्हणून तेथेच थांबविले. या यादीत धर्मेश त्यांचे भाऊ सुनील दर्शनही आहेत. दोन्ही भावांनी खूप काळ अक्षय कुमारला सोबत घेऊन चित्रपट बनविले. सुनील दर्शनने तर अक्षय कुमार सोबत आठ चित्रपट बनविले, तर धर्मेश दर्शनने धड़कन आणि बेवफा चित्रपटात अक्षयला घेतले होते. धर्मेश दर्शन धड़कन, राजा हिंदुस्तानी (आमिर खान) सारख्या प्रेमकथांच्या चित्रपटांचे चॅम्पियन बनले आणि ‘मेला’ या चित्रपटाने त्यांना मोठा फटका दिला. तर सुनील दर्शनने मसाला चित्रपट बनविले, ज्यात फॅ मिली इमोशन्स होते. आपल्या मुलाला अभिनेता बनविण्याच्या प्रयत्नात सुनील दर्शनची गाडी रुळावरून खाली उतरली आणि ते घरी बसले.