डिंपल कपाडिया अक्षय कुमारला समजत होती 'गे'
By Admin | Updated: November 14, 2016 23:20 IST2016-11-14T23:20:24+5:302016-11-14T23:20:24+5:30
चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या कार्यक्रमात अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनं खळबळजनक खुलासे केले आहेत.

डिंपल कपाडिया अक्षय कुमारला समजत होती 'गे'
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या कार्यक्रमात अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनं अक्षय कुमारसंदर्भात खळबळजनक खुलासे केले आहेत. करण जोहरनं या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या बॉलिवूड जोडप्याला आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात ट्विंकल खन्नानं अक्षय कुमारबाबत आश्चर्यचकित करणारा खुलासा केला आहे.
अक्षय कुमारला ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया गे समजत होती. जेव्हा ट्विंकलनं मी अक्षय कुमारशी लग्न करणार आहे, असं आईला सांगितलं त्यावेळी डिंपल कपाडियांना आश्चर्याचा धक्काच बसला, असं ट्विंकल म्हणाली आहे. अक्षयला डिंपल कपाडिया गे समजत होत्या. त्यानंतर डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारसंदर्भात सगळी माहिती गोळा केली. तसेच अक्षय कुमार लग्नानंतर मुलांना जन्म देण्यासाठी सक्षम आहे की नाही, यासाठी ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमारकडून जेनेटिक चाचणीही करवून घेतली. त्यानंतरच डिंपल कपाडियांनी ट्विंकल खन्नाला अक्षय कुमारशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली, असं ट्विंकल खन्ना हिनं खळबळजनक माहिती दिली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात अक्षय म्हणाला, डिंपल कपाडिया मला गे समजत असल्याचं माहीत झाल्यावर खूप राग आला होता. मात्र आजही पत्रिका पाहण्यापेक्षा जेनेटिक चाचणी करून लग्न करणं योग्य असल्याचं मत त्यानं मांडलं आहे.