पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:49 IST2025-06-30T08:49:21+5:302025-06-30T08:49:54+5:30

पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या सिनेमाला प्रमोट केल्याने दिलजीतवर खूप टीका होत आहे.

diljit dosanjh movie sardar ji 3 banned in india actor shows how it is superhit in pakistan starring pak actress hania amir | पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) 'सरदार जी ३' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भूमिका आहे. त्यामुळे हा सिनेमाभारतात रिलीज झालेला नसून इतर देशांमध्ये बघायला मिळत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या सिनेमाला प्रमोट केल्याने दिलजीतवर खूप टीका झाली. मात्र तरी तो आजही या सिनेमाला प्रमोट करत आहे. पाकिस्तानमध्ये सिनेमा कसा तुफान चालतोय आणि किती कमाई करत आहे याची माहिती त्याने दिली आहे. आता यावरूनही दिलजीतवर टीकेची झोड उठली आहे.

दिलजीत दोसांझने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानातील थिएटर्समध्ये 'सरदार जी ३' पाहून आलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे. व्हिडिओत हानियाचाही सीन आहे. दिलजीतने लिहिले, 'देशातील सर्वात मोठ्या अल्ट्रा स्क्रीनवर १२ शो. सरदार जी ३ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद. या अजून बघा.' यासोबत दिलजीतने आणखी एक फोटो शेअर करत सिनेमाची कमाईही दिली आहे. दोन दिवसात सिनेमाने जगभरात ११.०३ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ४.३२ कोटी तर दुसऱ्या दिवशी ६.७१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. दिलजीत आणि हानियाच्या 'सरदार जी ३'चं शूट त्याआधीच झालं होतं. मात्र भारत सरकारच्या निर्णयामुळे सिनेमा भारतात रिलीज होऊ शकला नाही. सिनेमाचा ट्रेलर रिलीजच्या एक आठवडा आधी आऊट करण्यात आला. दिलजीतने ट्रेलर शेअर केल्याने त्याच्यावर चांगलीच टीका झाली. मात्र त्याने अप्रत्यक्षरित्या तो पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूने असल्याचंच दाखवलं आहे. यानंतर 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन' ने दिलजीतच्या सर्व सिनेमांवर आणि कार्यक्रमांवर बंदीची मागणी केली आहे. तसंच त्याला आगामी 'बॉर्डर २'सिनेमातून काढण्याचीही मागणी केली आहे.

Web Title: diljit dosanjh movie sardar ji 3 banned in india actor shows how it is superhit in pakistan starring pak actress hania amir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.