‘दिलीपकुमार खूप लवकर रिटायर झाले’
By Admin | Updated: December 13, 2015 00:32 IST2015-12-13T00:32:29+5:302015-12-13T00:32:29+5:30
खरं तर मी खूप निराश आहे, कारण माझे आदर्श ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार खूपच लवकर म्हणजे तब्बल ४० वर्षे आधी रिटायर झाले. म्हणूनच मला त्यांच्यासह काम करता आले नाही...’

‘दिलीपकुमार खूप लवकर रिटायर झाले’
खरं तर मी खूप निराश आहे, कारण माझे आदर्श ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार खूपच लवकर म्हणजे तब्बल ४० वर्षे आधी रिटायर झाले. म्हणूनच मला त्यांच्यासह काम करता आले नाही...’ अभिनेता कमल हसन याची ही प्रतिक्रिया. दिलीपकुमार यांचा शुक्रवारी ९३ वा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याने दिलीपसाहेबांबाबतच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यासह काम करण्याची संधी मिळावी म्हणून तामिळ चित्रपट ‘थेवरमगन’ हिंदीत करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला; परंतु त्यांनी नकार दिला. चित्रपटात मी स्वत: वडील व मुलाची भूमिका करणार होतो. त्यामुळे ते नाराज आहेत, असे वाटले. परंतु, मला त्याच्यासह काम करण्याची संधी गमवायची नव्हती. म्हणून मी यातून बाजूला झालो. अखेर मला नकाराचे कारण कळाले. ते म्हणजे, या चित्रपटात खूनखराबा होता. तो त्यांना मान्य नव्हता.