दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा...! सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन

By रूपाली मुधोळकर | Updated: December 7, 2020 11:57 IST2020-12-07T11:54:13+5:302020-12-07T11:57:34+5:30

लोकांनी कौतुक करावे म्हणून नाही तर प्रेमापोटी दिलीप साहेबांची काळजी घेते... 

dilip kumar is not too well wife saira banu says please pray for him | दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा...! सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन

दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा...! सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन

ठळक मुद्देकोरोना संक्रमणामुळे याच वर्षात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले.

97 वर्षांचे बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून फार बरी नाही. ते कमालीचे अशक्त झाले असून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी झाली आहे. अशात दिलीप साहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केले आहे.


टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले. त्यांची प्रकृती फार बरी नाही. ते खूप अशक्त झाले आहेत. कधीकधी चालत ते हॉलमध्ये येतात आणि परत आपल्या खोलीत जातात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालीये. त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. प्रत्येक उगवणा-या दिवसासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून दिलीप कुमार यांना घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी आम्ही घेत आहोत, असे त्या म्हणाल्या.

वो मेरी जिंदगी है...
मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है, असे सायरा बानो यावेळी म्हणाल्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो म्हणाल्या.

माझ्या पांढऱ्या केसांकडे तर बघ...! दिलीप कुमार यांनी लाख प्रयत्न केलेत पण सायरा बानोंच्या जिद्दीपुढे नमले!!

याच वर्षी दोन भावांचे निधन
कोरोना संक्रमणामुळे याच वर्षात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.


 

Read in English

Web Title: dilip kumar is not too well wife saira banu says please pray for him