धर्मेंद्र यांच्या ‘या’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा करणार स्पेशल डान्स, सलमान आणि रेखाही धरणार ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 21:29 IST2018-04-01T15:59:25+5:302018-04-01T21:29:25+5:30
बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच एक स्पेशल डान्स करताना बघावयास मिळणार आहे. होय, धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी ...

धर्मेंद्र यांच्या ‘या’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा करणार स्पेशल डान्स, सलमान आणि रेखाही धरणार ठेका!
ब लिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच एक स्पेशल डान्स करताना बघावयास मिळणार आहे. होय, धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या आगामी ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटात सोनाक्षी जबरदस्त डान्स करताना बघावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री रेखा हेदेखील एका गाण्यावर ठेका धरताना बघावयास मिळणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीचा एकही चित्रपट हिट ठरला नसला तरी, इंडस्ट्रीतील तिचा दबदबा कायम आहे. कारण करिअरच्या पहिल्याच टप्प्यात तिला सुपरस्टार सलमानची साथ मिळाली, जी अजूनही कायम आहे. त्यामुळेच ती ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्ये सलमान आणि रेखा यांच्यासोबत एक स्पेशल डान्स करताना बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सोनाक्षी या दोन्ही दिग्गज कलाकारांसोबत परफॉर्मन्स करण्यास खूपच उत्सुक आहे.
![]()
याविषयी तिने सांगितले की, होय, मी एका स्पेशल गाण्यात बघावयास मिळणार आहे. सलमान खान, रेखाजी, धर्मेंद्र आणि मी या गाण्यात असेल. इंडस्ट्रीतील अनुभवी आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करणे ही सन्मानाचीच बाब आहे. त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणे माझ्यासाठी खूपच उत्साह निर्माण करणारी बाब आहे. मी या गाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे.
![]()
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. सोनाक्षीबद्दल सांगायचे झाल्यास ती सलमान खानच्याच आगामी ‘रेस-३’मध्ये एक स्पेशल डान्स नंबर करताना बघावयास मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त ती ‘दबंग-३’मुळेही चांगलीच चर्चेत आहे. सलमान ‘रेस-३’नंतर लगेचच ‘दबंग-३’वर काम करणार आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षीचेच नाव निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.