धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:11 IST2025-11-25T09:10:48+5:302025-11-25T09:11:50+5:30
Dharmendra Death fans unhappy: धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढता त्यांच्यावर गपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले

धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
Dharmendra Death fans unhappy: बॉलिवूडचा ही मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज (२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यावर धमेंद्र यांचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
सनी-बॉबीचे सिनेमा आता कधीच पाहणार नाही
जेव्हा मुंबईतील धमेंद्र यांच्या चाहत्यांना कळले की त्यांचा आवडता स्टार आता या जगात नाही आणि त्याचे अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले आहेत, तेव्हा ते निराश झाले. त्यांना धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शन घ्यायला न मिळाल्याचे दु:ख झाले. तसेच टीव्हीनाइनशी बोलताना चाहत्यांनी राग व्यक्त केला. आम्हाला शेवटचे वेळा त्याला पाहण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे आम्ही असमाधानी आणि नाराज आहोत असे चाहते म्हणाले. काही महिला चाहतावर्ग म्हणाला की, आमच्या मनात सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याबद्दल नेहमीच राग राहील. आम्ही त्यांचे चित्रपट पुन्हा कधीही पाहणार नाही.
यावेळी धर्मेंद्र यांचे चाहते खूप रडत होते. त्या सर्वांनी धर्मेंद्र यांच्या आठवणीत एक गाणेही गायले आणि त्यांच्या हिरोला निरोप दिला. धर्मेंद्र काही काळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर घरी उपचार करण्यात आले आणि २४ नोव्हेंबरला अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट
धर्मेंद्र त्यांच्या चित्रपटांद्वारे नेहमीच लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांचा एक चित्रपट अवघ्या एका महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाचे नाव 'इक्किस'. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.