‘धनगरवाडा’ पोहोचतोय गावागावांत

By Admin | Updated: December 3, 2015 02:47 IST2015-12-03T02:47:32+5:302015-12-03T02:47:32+5:30

जेजुरी गडाधिष्ठित देव मल्हारीचा जयघोष तुम्ही आजवर फक्त जेजुरीला, चित्रपटात किंवा मालिकांमध्येच ऐकला असेल; पण धनगरवाडा हा चित्रपट पाहण्यासाठीपण ‘येळकोट येळकोट...

'Dhanwarwada' is reaching the village | ‘धनगरवाडा’ पोहोचतोय गावागावांत

‘धनगरवाडा’ पोहोचतोय गावागावांत

जेजुरी गडाधिष्ठित देव मल्हारीचा जयघोष तुम्ही आजवर फक्त जेजुरीला, चित्रपटात किंवा मालिकांमध्येच ऐकला असेल; पण धनगरवाडा हा चित्रपट पाहण्यासाठीपण ‘येळकोट येळकोट...जय मल्हार’ अशा ललकाऱ्या देत महाराष्ट्राच्या कडेकपारींतून प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करीत आहेत. मराठी चित्रपट बहुतांशी मुंबई-पुण्यापर्यंतच मर्यादित राहिलेला असताना ‘धनगरवाडा’ या चित्रपटाच्या निर्मात्या अलका कुबल-आठल्ये यांनी ग्रामीण भागात प्रमोशन आणि प्रीमिअर शोचे आयोजन करून स्थानिक प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणण्यात यश मिळविले आहे.
विजयकुमार दळवी यांच्या गाजलेल्या धनगरवाडा या कादंबरीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर यांची ग्रामीण भागातील प्रेक्षकांमध्ये असलेली लोकप्रियता, भ्रमंती आणि अभ्यास यांमुळे या चित्रपटाचे प्रोमोशन आणि प्रीमिअर शो धनगरबहुल तालुक्यांमध्ये एका अनोख्या पद्धतीने सुरू आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचावा, याकरिता संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रातील आणि विषेशत: धनगर समाजाच्या जवळपास सव्वाशे जत्रांमध्ये दाखविण्यात येत आहे. याबद्दल अलका-कुबल आठल्ये सांगतात, ‘धनगरवाडा हा सिनेमा केवळ धनगर समाजापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील जगायला आणि मरायलाही घाबरणाऱ्या प्रत्येक अन्यायग्रस्त घटकासाठी आहे.’

Web Title: 'Dhanwarwada' is reaching the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.