'तेरे इश्क में' सुपरहिट, धनुष-आनंद एल राय चौथ्या सिनेमाच्या तयारित? वेगळी असणार कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:16 IST2026-01-07T11:15:28+5:302026-01-07T11:16:09+5:30
धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल राय यांची जोडी नवीन सिनेमातून पुन्हा भेटीला येणार

'तेरे इश्क में' सुपरहिट, धनुष-आनंद एल राय चौथ्या सिनेमाच्या तयारित? वेगळी असणार कथा
अभिनेता धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल राय ही जोडी सुपरहिट आहे. 'रांझणा' हा कल्ट सिनेमा देणाऱ्या या जोडीने नंतर 'अतरंगी रे' आणि आता 'तेरे इश्क में' हा सिनेमा केला. आनंद एल राय यांच्या सिनेमात धनुषचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. प्रेम, प्रेमातलं वेड, त्यातून येणारं वादळ, दमदार क्लायमॅक्स आणि कायम लक्षात राहणारे डायलॉग्स यामुळे त्यांचा सिनेमा कायम वरचढ ठरतो. आता ही जोडी चौथा सिनेमा घेऊन येणार आहे.
मिड डे रिपोर्टनुसार, आनंद एल राय आणि धनुष चौथ्या सिनेमासाठी पुन्हा सोबत येत आहेत. हा एक पीरियड अॅक्शन रोमान्स असणार अशी चर्चा आहे. जर सिनेमाची अधिकृत घोषणा झाली तर हा येत्या वर्षातला हाय प्रोफाइल प्रोजेक्ट असणार आहे. दोघंही या पीरियड अॅक्शन रोमान्स सिनेमावर काम करत आहेत. आतापर्यंत या जोडीने केवळ मानवी भावना आणि प्रेमातील गुंतागुंत पडद्यावर मांडली होती. मात्र, यावेळी प्रेमासोबतच ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दमदार ‘अॅक्शन’चा तडका पाहायला मिळणार आहे. अद्याप मेकर्सकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या चर्चांमुळे चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.
या सिनेमाचे कथानक कोणत्या कालखंडावर आधारित असेल, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी हा आनंद एल राय यांचा सर्वात भव्य प्रोजेक्ट पैकी एक असल्याचे बोलले जात आहे. २८ नोव्हेंबर रोजी 'तेरे इश्क में' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये धनुषसोबत क्रितीची जोडी जमली होती. सिनेमाने १४८ कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. काही दिवसात सिनेमा ओटीटीवरही उपलब्ध होणार आहे. या सिनेमाचे कथानक कोणत्या कालखंडावर आधारित असेल, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी हा आनंद एल राय यांच्या करिअरमधील सर्वात भव्य प्रोजेक्ट पैकी एक असल्याचे बोलले जात आहे.