धनश्रीसमोर फराह खाननं युजवेंद्र चहलचं केलं कौतुक, म्हणाली "तो खूप चांगला मुलगा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:26 IST2025-09-03T17:24:32+5:302025-09-03T17:26:57+5:30
नुकतंच फराह खान धनश्री वर्माच्या घरी पोहोचली.

धनश्रीसमोर फराह खाननं युजवेंद्र चहलचं केलं कौतुक, म्हणाली "तो खूप चांगला मुलगा..."
भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर ४-५ वर्षांतच चहल आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नुकतंच बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ही धनश्री वर्माच्या मुंबईतील घरी पोहोचली होती यावेळी धनश्रीशी बोलताना फराहनं युजवेंद्रचं कौतुक केलं.
फरहाने हा व्लॉग तिच्या युट्यूब चॅनेलवरुन अपलोड केला आहे. या व्लॉगमध्ये फराहनं धनश्रीसोबत विविध विषयांवर गप्पा मारल्याचं पाहायला मिळालं. यावेळी फराह म्हणाली, "मी अजूनही युजीसोबत मेसेजवरुन संपर्कात आहे. तो मला माँ म्हणायचा. तो खूप चांगला आहे".
दरम्यान, धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ट्रेंडिंग गाण्यावरचे रील व्हिडिओही ती शेअर करत असते. धनश्रीने २०२०मध्ये क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. आता ती रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे.