'धग' आता आॅस्करच्या शर्यर्तीत!
By Admin | Updated: December 16, 2014 00:51 IST2014-12-16T00:51:16+5:302014-12-16T00:51:16+5:30
आजवर ३ राष्ट्रीय पुरस्कारांसोबत एकूण ४७ पुरस्कारांनी घवघवीत यश मिळवलेल्या 'धग' या चित्रपटाने आॅस्कर पुरस्कारांच्या शर्यर्तीत आपली वैयक्तिक प्रवेशिका पाठवून या

'धग' आता आॅस्करच्या शर्यर्तीत!
आजवर ३ राष्ट्रीय पुरस्कारांसोबत एकूण ४७ पुरस्कारांनी घवघवीत यश मिळवलेल्या 'धग' या चित्रपटाने आॅस्कर पुरस्कारांच्या शर्यर्तीत आपली वैयक्तिक प्रवेशिका पाठवून या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. चित्रपटांच्या खुल्या विभागातील अंतिम ३०० चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला असून मेन स्ट्रीम कॅटेगरीत आॅस्करच्या नॉमिनेशन यादीत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना आपले आव्हान टिकवून ठेवावे लागणार आहे. परंपरागत सामाजिक व्यवसायाचं जोखाड दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाची कथा 'धग' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेते उपेंद्र लिमये, अभिनेत्री उषा जाधव, नागेश भोसले, सुहासिनी देशपांडे, बालकलाकार हंसराज जगताप, नेहा दाकिणकर आदींच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन नितिन दिक्षित यांचे आहे, तर संगीत आदिरामचंद्र यांचे आहे. आता आॅस्करच्या शर्यर्तीत टिकून राहण्यासाठी या चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात करावे लागणार असून यासाठी होणारा खर्च ही जास्त असून सरकार, सांस्कृतिक खाते यांच्याकडून मदत मिळणे गरजेचे असल्याचे या चित्रपटाचे निर्माते विशाल पंडीत गवारे यांनी सांगितले.