मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:23 PM2022-04-29T18:23:22+5:302022-04-29T18:27:59+5:30

कंगना राणौतचा अॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

Dhaakad official trailer kangana ranaut agent agni arjun rampal divya dutta deepak mukut | मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

कंगना राणौत (Kangana Ranaut)चा बहुप्रतिक्षित 'धाकड'  (Dhaakad) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होतोय.

धाकड (Dhaakad)  सोबतच कंगना राणौतनेही तिचा स्टॅमिना दाखवला आहे. कंगनाने सांगितले की, अशी कोणतीही भूमिका नाही जी ती करू शकत नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बॉलिवूड क्वीन कंगनाचा Badass अवतार पाहायला मिळणार आहे. रजनीश रझी घई दिग्दर्शित 'धाकड' चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्त मुख्य भूमिकेत आहेत. धडकमध्ये कंगना आजवर साकारलेल्या पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणार आहे.


चित्रपटात, कंगना एजंट अग्नीची भूमिका साकारते आहे, एक अत्यंत ट्रेंडिंग आणि सर्वात घातक फील्ड एजंट. एजंट अग्निच्या भूमिकेसाठी कंगनाने ३ महिने ट्रेनिंग घेतली.धडकमध्ये कंगना आणि अर्जुन रामपाल आमनेसामने येणार आहेत.'धाकड'मधील कंगनाचा डॅशिंग लूक चाहत्यांना भावतो आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे.

कंगनाचा हा चित्रपट रजनीश घई यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दीपक मुकुट आणि सोहेल मकलाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'धाकड'च्या निर्मात्यांना आधी 27 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता. याची माहिती कंगनाने इंस्टाग्रामवरही शेअर केली होती, मात्र, चित्रपटाची तारीख बदलून तो एका आठवड्यापूर्वी प्रदर्शित होत आहे. आता 'धाकड' 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Dhaakad official trailer kangana ranaut agent agni arjun rampal divya dutta deepak mukut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.