श्रद्धाने अर्जुनला दिले मराठीचे धडे!!

By Admin | Updated: April 24, 2017 02:04 IST2017-04-24T02:04:36+5:302017-04-24T02:04:36+5:30

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी श्रद्धा कपूर हिला मराठी भाषा अन् संस्कृतीविषयी विशेष आदर आहे.

Devotional lessons given by Arogya | श्रद्धाने अर्जुनला दिले मराठीचे धडे!!

श्रद्धाने अर्जुनला दिले मराठीचे धडे!!

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी श्रद्धा कपूर हिला मराठी भाषा अन् संस्कृतीविषयी विशेष आदर आहे. याची खास झलक बघावयास मिळाली, तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर. शूटिंगदरम्यान ती तिचा सहकलाकार अर्जुन कपूर याला मराठी भाषेचे धडे देताना बघावयास मिळाली. शूटिंगदरम्यान जेव्हा-केव्हा श्रद्धा आणि अर्जुनला रिकामा वेळ मिळत असे तेव्हा ती अर्जुनची शिक्षिका बनत असे. विशेष म्हणजे अर्जुन एखाद्या आज्ञाधारी विद्यार्थ्याप्रमाणे श्रद्धाने दिलेला प्रत्येक धडा नीट समजून घेत असे. आपल्या गुरूकडून मिळत असलेले ज्ञान तो अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. याविषयी श्रद्धा सांगते, की मी अर्जुनला तोडकी-मोडकी मराठी भाषा शिकविली आहे. तेव्हा श्रद्धाने अर्जुनला म्हटले की, सांग मी तुला काय शिकविले? तर त्याने उत्तर दिले, की ‘तू खूप छान पोरगी आहेस.’ अर्जुनच्या या उत्तराने श्रद्धाच्या चेहऱ्यावर लगेचच हास्य फुलले. या संगीतमय रोमॅण्टिक चित्रपटातून पहिल्यांदाच श्रद्धा आणि अर्जुनची जोडी मोठ्या पडद्यावर बघावयास मिळणार आहे.

Web Title: Devotional lessons given by Arogya