दिग्दर्शनात नशीब अजमावणार हुमा

By Admin | Updated: October 17, 2014 23:30 IST2014-10-17T23:30:57+5:302014-10-17T23:30:57+5:30

अ भिनेत्री हुमा कुरैशी हॉलीवूड स्टार अँजेलिना जोलीप्रमाणो भविष्यात दिग्दर्शनात नशीब अजमावण्याचा विचार करीत आहे.

Destruction in Humor | दिग्दर्शनात नशीब अजमावणार हुमा

दिग्दर्शनात नशीब अजमावणार हुमा

अ भिनेत्री हुमा कुरैशी हॉलीवूड स्टार अँजेलिना जोलीप्रमाणो भविष्यात दिग्दर्शनात नशीब अजमावण्याचा विचार करीत आहे. जिया, गर्ल, इंटरप्टेड आणि लारा क्रॉफ्ट टाँब रेडरसारख्या यशस्वी चित्रपटांत अभिनय केल्यानंतर अँजेलिनाने 2क्11 मध्ये इन द लँड ऑफ ब्लड अँड हनी या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. गँग्ज ऑफ वासेपूर, एक थी डायनसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी हुमा अँजेलिनाच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित असून तिलाही दिग्दर्शनात नशीब अजमावायचे आहे. हुमाने तिचा भाऊ असलेल्या साकिब सलीमसोबत कधीही दिग्दर्शन करणार नसल्याचे म्हटले आहे. तिच्यामते विचार वेगळे असल्याने एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रश्नच येत नाही; पण साकिबसोबत चित्रपटात अभिनय करण्याची मात्र तिची इच्छा आहे. 

 

Web Title: Destruction in Humor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.