हॉलिवूडचा हा दिग्गज पडलाय दीपिकाच्या प्रेमात !
By Admin | Updated: October 28, 2016 17:15 IST2016-10-28T17:12:46+5:302016-10-28T17:15:45+5:30
अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करेल.

हॉलिवूडचा हा दिग्गज पडलाय दीपिकाच्या प्रेमात !
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेल सोबत xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. या चित्रपटाचा ट्रेलर कलर्स टीव्हीवरील प्रसीद्ध कार्यक्रम बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आला.
दीपिकासाठी चांगली गोष्ट म्हणजे विन डिझेल दीपिकावर भलताच खुष असून तिचं कौतूक करताना तो थकत नाही असंच म्हणावं लागेल. दीपिका पुढील ग्लोबल सुपरस्टार असेल असं मोठं वक्तव्य त्यानं केलंय. सीएनएन न्यूजसोबत बोलताना त्याने हे वक्तव्य केलं.
तो म्हणाला, ''मला दीपिका खूप आवडते, आम्हा दोघांची केमिस्ट्री अत्यंत चांगली आणि नैसर्गिक आहे. दीपिकासोबत चांगले क्षण घालवले. जेव्हा ती टेस्ट देण्यासाठी आली होती, तेव्हा सर्व तिला पाहतंच राहिले...ही किती हॉट आहे...दोघांची केमिस्टी अफलातून आहे असंच सगळ्यांच्या तोंडातून निघालं. आम्ही शूटिंगच्या आधी बराच वेळ एकमेकांसोबत घालवल्याने इतकी चांगली केमिस्ट्री सिनेमात दिसते, दीपिकासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आवडला, दीपिकासाठी माझ्या मनात किती प्रेम आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत असं तो म्हणाला. एकत्र शूट केलेले आमचे सीन्स बघा ते किती छान आहेत, समुद्रकिनारी चित्रित केलेला सीन माझा फेवरेट सीन आहे असंही त्याने सांगितलं. इतक्यावरच न थांबता डिझेल म्हणाला, जगाला दीपिकाची ओळख करून देणा-या चित्रपटात काम केल्याचा मला गर्व आहे, भारतातून येणा-या पुढल्या ग्लोबल सुपरस्टारसाठी जगाने तयार रहावं''.