दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:47 PM2024-05-07T14:47:57+5:302024-05-07T14:49:19+5:30

दीपिकाचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसत आहे.

Deepika Padukone enjoying babymoon with Ranveer Singh babybump showing | दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या मदरहुड एन्जॉय करत आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिका पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे तिने यंदा Met Gala या आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटलाही हजेरी लावली नाही. मग दीपिका नक्की आहे तरी कुठे? तर ती सध्या नवऱ्यासोबत बेबीमून एन्जॉय करत आहे. दोघंही सुंदर ठिकाणी वेळ घालवत आहेत. दरम्यान दीपिकाचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसत आहे.

दीपिका आणि रणवीर सिंह हे मोस्ट फेवरेट कपल सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. दीपिकाने प्रेग्नंसीच्या कारणाने कामातून ब्रेक घेतला आहे. ती केवळ 'सिंघम अगेन' च्या शूटमध्ये आहे. तर रणवीर सिंहनेही कामातून ब्रेक घेत बायकोसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच दोघांचा एका क्रुझवरुन उतरतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये दीपिका पायऱ्यांवरुन उतरत असून त्यात तिचं बेबी बंप स्पष्ट दिसून येत आहे. एका फॅन पेजवरुन तिचा हा फोटो व्हायरल होत आहे.

2017 साला दीपिकाने Met Gala मध्ये पदार्पण केले होते. यानंतर 2018 आणि 2019 सालीही ती या इव्हेंटमध्ये दिसली. मात्र यंदा तिने प्रेग्नंसीच्या कारणाने इव्हेंटला हजेरी लावली नाही.तसंच सिंघम अगेनचं शूट हेही कारण होतंच.  तिचे सेटवरील काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तसंच प्रियंका चोप्राची यावेळी अनुपस्थित होती. तर दुसरीकडे आलिया भटने मात्र भारतीय संस्कृतीचं उत्तम दर्शन घडवलं. 

दीपिका पदुकोण आगामी 'कल्कि 2898 एडी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. 27 जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: Deepika Padukone enjoying babymoon with Ranveer Singh babybump showing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.