दीपिका-ज्ॉकलीनमध्ये ‘शुद्धी’साठी मुकाबला

By Admin | Updated: August 2, 2014 23:48 IST2014-08-02T23:48:31+5:302014-08-02T23:48:31+5:30

करण जोहरला ‘शुद्धी’साठी अथक प्रयत्नानंतर सलमान खानला साईन करण्यात यश आले.

Deepika-Jokleen competes for 'Shuddhi' | दीपिका-ज्ॉकलीनमध्ये ‘शुद्धी’साठी मुकाबला

दीपिका-ज्ॉकलीनमध्ये ‘शुद्धी’साठी मुकाबला

करण जोहरला ‘शुद्धी’साठी अथक प्रयत्नानंतर सलमान खानला साईन करण्यात यश आले. आता हिरोईनचा शोध सुरू आहे. हृतिकने चित्रपट करायला नकार दिल्यानंतर करिना कपूरनेही काढता पाय घेतला होता. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला साईन करण्यासाठी करण उत्सुक आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ‘ये जवानी है दिवानी’ या सुपरहिट चित्रपटात दीपिकाने काम केले आहे. सलमानसोबत दीपिकाचा एकही चित्रपट नाही, त्यामुळे या दोघांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर दाखवायला करण उत्सुक आहे.  करणचे दीपिकासोबत बोलणो झाले आहे; पण तारखांची समस्या आहे. अद्याप दीपिकाने नकार  दिलेला नाही. दुसरीकडे सलमानने करणला ज्ॉकलीन फर्नाडिसचे नाव सुचवल्याचे कळते. सलमान ज्ॉकलीनची जोडी किकमध्ये दिसली. ही जोडी पुन्हा दिसावी अशी सलमानची इच्छा आहे. त्याची इच्छा नाकारण्याची हिंमत कोणी करीत नाही. त्यामुळे ‘शुद्धी’मध्ये सलमानची हिरोईन बनण्याची संधी पुन्हा ज्ॉकलीनला मिळू शकते.

 

Web Title: Deepika-Jokleen competes for 'Shuddhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.