दीप्ती बनली रेडिओ जॉकी
By Admin | Updated: June 14, 2017 02:11 IST2017-06-14T02:11:13+5:302017-06-14T02:11:13+5:30
मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दीप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. दीप्तीच्या

दीप्ती बनली रेडिओ जॉकी
मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दीप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. दीप्तीच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आगामी ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ हा मराठी चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल. संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शनचा डॉ. संदेश म्हात्रेनिर्मित आणि गिरीश मोहितेदिग्दर्शित चित्रपट ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात दीप्ती देवी ‘आरजे स्वरा हळदणकर" ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. याविषयी दीप्ती सांगते, की ‘आरजे’ची भूमिका ही चॅलेंजिंग आणि तितकीच इंटरेस्टिंग असते. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते. या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवताना ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पाहाते, यावर कंडिशन्स अप्लाय हा सिनेमा भाष्य करतो.कंडिशन्स अप्लायमध्ये दीप्ती देवीसोबत सुबोध भावे, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय पवार यांचे आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलन नीलेश गावंड यांचे आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजित यांनी दिले आहे. सचिन भोसले आणि अमोल साखरकर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ कार्यकारी निर्माते आहेत.