Kolhapur: हुपरीतील दीपकला अखेर कडकलक्ष्मी पावली, एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:01 IST2025-03-18T13:00:49+5:302025-03-18T13:01:36+5:30

हुपरी : कडकलक्ष्मी अर्थात मरीआई प्रत्येकाला पावावी म्हणून दारोदारी भटकणा-या रौप्यनगरी हुपरी (ता.हातकणंगले) च्या दीपक भीमराव कोळी याला एका ...

Deepak Bhimrao Koli from Hupri Kolhapur was selected in a reality show | Kolhapur: हुपरीतील दीपकला अखेर कडकलक्ष्मी पावली, एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली

Kolhapur: हुपरीतील दीपकला अखेर कडकलक्ष्मी पावली, एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली

हुपरी : कडकलक्ष्मी अर्थात मरीआई प्रत्येकाला पावावी म्हणून दारोदारी भटकणा-या रौप्यनगरी हुपरी (ता.हातकणंगले) च्या दीपक भीमराव कोळी याला एका मराठी टीव्ही चॅनेलच्या रूपाने कडकलक्ष्मी पावली आहे. एका कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली आहे. 

वाळवेकरनगर वसाहतीत झोपडीसद्रुश्य घरात राहणारा दीपक हा कडकलक्ष्मी (पोतराज ) समाजातील तरुण. पोटाची खळगी भरावी म्हणून कुटुंबासह गावोगावी आणि दारोदारी दररोज भटकायचे याच्या पाचवीला पूजलेलं. डोक्यावर कडकलक्ष्मीचा देव्हारा (पेटारा ) घेऊन गल्ली बोळात फिरताना सोबत असणारी घरातील महिला ढोलाचा गुबूगुबू आवाज काढून कडकलक्ष्मी गल्लीत आल्याची जाणीव करून देतात. तरीही काही महिला घराबाहेर पडत नाहीत अशा वेळी दीपक आपल्या हातातील आसूडाने आपल्याच अंगावर फटाफट फटके मारायला सुरवात करतो. 

फटक्याचा आवाज ऐकून घरातील बायाबापड्या सुपातून धान्य व हळदी कुंकु व दोन पांच रुपये दक्षिणा घेऊन येतात व  कडकलक्ष्मीला पाया पडून आशीर्वाद घेतात. अशा प्रकारे चारितार्थ चालवणाऱ्या दीपकला एका मराठी वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या रिअॅलिटी शोमध्ये रविवारी झळकला. त्याची या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील १३ तरुणांचा समावेश असणार आहे. या तरुणांना सुंदर तरुणी शहरात राहण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने दीपकला स्वप्नातील जग पहायला मिळणार आहे. पैसा, प्रतिष्ठा मिळणार आहे. 

Web Title: Deepak Bhimrao Koli from Hupri Kolhapur was selected in a reality show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.