डिअर जिंदगीला मराठमोळा टच...

By Admin | Updated: November 14, 2016 03:34 IST2016-11-14T03:34:19+5:302016-11-14T03:34:19+5:30

शाहरुख खान आणि आलिया भट यांच्या डिअर जिंदगी या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. एक रिफ्रेशिंग जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने

Dear Zindagi, Marathamola Touch ... | डिअर जिंदगीला मराठमोळा टच...

डिअर जिंदगीला मराठमोळा टच...

शाहरुख खान आणि आलिया भट यांच्या डिअर जिंदगी या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. एक रिफ्रेशिंग जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार आहे. पण, तुम्हाला हे माहितीय का? या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मराठमोळ्या लक्ष्मण उत्तेकर यांनी केली आहे. लक्ष्मणने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत उल्लेखनीय काम केले आहे. आता पुन्हा एकदा त्याने ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून त्याच्या कामाची छाप उमटविली आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना लक्ष्मण सांगतो, मी याआधी गौरी शिंदेच्या अनेक चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. तिच्यासोबत काम करताना नेहमीच छान वाटते. गौरीच्या चित्रपटाच्या संकल्पना या नेहमीच संवेदनशील असतात. चित्रपटातील पात्राला नक्की काय म्हणायचे आहे, हे योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. तसेच, या चित्रपटात शाहरुखसोबत काम करायचे होते. शाहरुख एक सुपरस्टार जरी असला, तरी तो सेटवर अतिशय प्रोफेशनल असतो. त्याच्यासोबत काम करतानाचा माझा अनुभव अतिशय वेगळा होता, असेच मी सांगेन. डिअर जिंदगी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील दृश्ये लक्ष्मणने कॅमेऱ्यात कशी बंदिस्त केली आहेत, हे आपल्याला लवकरच दिसेल.

Web Title: Dear Zindagi, Marathamola Touch ...