गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:25 IST2025-08-25T15:24:50+5:302025-08-25T15:25:22+5:30

Tina on Govinda and Sunita Ahuja : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या वृत्तांमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. अलीकडेच असे वृत्त समोर आले होते की अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. आता मुलगी टीना आहुजाने यावर मौन सोडले आहे.

Daughter Tina breaks silence on Govinda and Sunita Ahuja's divorce news, says - I feel like I belong to this family... | गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."

गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."

गेल्या काही दिवसांपासून गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) चर्चेत आहेत. ते दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असे म्हटले जात आहे की सुनीताने अभिनेत्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे आणि ३८ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दरम्यान आता त्यांची मुलगी टीना आहुजा (Tina Ahuja) हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना टीना आहुजाने चाहत्यांचे आभार मानले आणि तिच्या पालकांच्या घटस्फोटाच्या वृत्तांचे खंडन केले. ती म्हणाली, "या सर्व अफवा आहेत आणि ती या अफवांकडे लक्ष देत नाही." टीना आहुजा पुढे म्हणाली, "या सुंदर कुटुंबाची मी एक भाग असल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि मीडिया, चाहते आणि प्रियजनांकडून आम्हाला मिळत असलेल्या प्रेम, काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे." 

सुनीताने केलेत अभिनेत्यावर हे आरोप
हॉटरफ्लायच्या वृत्तानुसार, सुनीता आहुजाने ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अहवालात म्हटले आहे की सुनीताने प्रेम आणि विवाहात फसवणूक, दुखावणे आणि वेगळे राहण्याच्या आधारावर हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia), (ib) अंतर्गत खटला दाखल केला होता.

गोविंदाच्या मॅनेजरने म्हटले...
गोविंदाच्या मॅनेजर शशी यांनीही एका मुलाखतीत म्हटले होते की, "प्रत्येक जोडप्यात थोडेफार मतभेद असतात. या सर्व जुन्या गोष्टी आहेत. आता लोक आणि मीडिया त्याला मीठ मसाला लावून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत."

Web Title: Daughter Tina breaks silence on Govinda and Sunita Ahuja's divorce news, says - I feel like I belong to this family...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.