तणावमुक्तीसाठी डान्सिंग आवडते -डेझी शाह
By Admin | Updated: December 14, 2015 01:17 IST2015-12-14T01:17:18+5:302015-12-14T01:17:18+5:30
अभिनेत्री आणि डान्सर डेझी शाह ही कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडे पूर्वी सहाय्यक तेव्हा त्याविषयी ती म्हणते,‘डान्सिंग ही स्ट्रेसबस्टर असते

तणावमुक्तीसाठी डान्सिंग आवडते -डेझी शाह
अभिनेत्री आणि डान्सर डेझी शाह ही कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडे पूर्वी सहाय्यक तेव्हा त्याविषयी ती म्हणते,‘डान्सिंग ही स्ट्रेसबस्टर असते. कलाकाराला असलेली काळजी, चिंता ही डान्स करताना निघून जाते. एकदम रिलॅक्स आणि शांत वाटते.’ सलमान खान सोबत डेझीने २०१४ मध्ये ‘जय हो’ चित्रपटात काम केले. त्याअगोदर तिने कोरिओग्राफर गणेश आचार्य सोबत सहाय्यक म्हणून ‘जमीन’, ‘खाकी’ चित्रपटात काम केले आहे. तिला अॅक्टिंग आणि डान्सिंग यापैकी काय आवडते? असे विचारण्यात आले. तेव्हा डेझीने उत्तर दिले की, ‘जेव्हा डान्सिंगचा संबंध येतो तेव्हा मी अभिनय विसरते. कारण, डान्स म्हणजे माझा आत्मा आहे. मला नेहमी काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करण्याची इच्छा असते. ’