ऐतिहासिक चित्रपटांवर वादाचे सावट
By Admin | Updated: December 7, 2015 01:14 IST2015-12-07T01:14:37+5:302015-12-07T01:14:37+5:30
संजय लीला भंसाळींचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट अनेक कारणांनी गाजत आहे. यातले एक कारण इतिहासासोबत छेडखानीच्या आरोपाचेही आहे.

ऐतिहासिक चित्रपटांवर वादाचे सावट
संजय लीला भंसाळींचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट अनेक कारणांनी गाजत आहे. यातले एक कारण इतिहासासोबत छेडखानीच्या आरोपाचेही आहे. या आरोपावरून निर्माण झालेला वाद आता मध्यप्रदेशच्या न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यातले मुख्य वादाचे कारण बाजीरावची पत्नी काशीबाई आणि मस्तानींच्या पात्रांचे जे नृत्य या चित्रपटात आहे ते आहे. ज्यात दोघींना सोबत नाचताना दाखविण्यात आले आहे. मात्र इतिहासात अशी कुठलीही नोंद नाही, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे. या आधीही निर्माण झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांवर असेच वादाचे सावट घोंगावत राहिले आहे. त्यावर एक नजर...
भंसाळींसाठीही हा पहिला अनुभव नाही. त्यांनी जेव्हा शाहरूख खानला घेऊन देवदास चित्रपट बनविला, त्यातही चंद्रमुखी आणि पारो यांना सोबत नाचविले होते. देवदासवर लिखित मूळ कादंबरीमध्ये चंद्रमुखी आणि पारो कधी समोरासमोर येण्याचा उल्लेख नव्हता. यावर खूप वाद झाला होता. आशुतोष गोवारीकरने हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉयसोबत जोधा - अकबर चित्रपटाची निर्मिती केली. या भव्य चित्रपटावरदेखील असेच आरोप लागले. राजस्थानाशी संबंधित काही लोक आणि गटांतर्फे या चित्रपटात राजपूत समाजाबाबत चुकीचे चित्रीकरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. दोघांकडून इतिहासाच्या पुस्तकांचा पुरावाही देण्यात आला. अखेर हा वाद सामंजस्याने मिटला.
१९५३ मध्ये सोहराब मोदी यांनी राणी लक्ष्मीबाईवर आधारित चित्रपट बनविला, तर यावरही ऐतिहासिक घटनांशी छेडछाडीचे आरोप लावण्यात आले. मात्र, सोहराब मोदी यांनी या विरोधाला गंभीरतेने घेतले नाही आणि चित्रपट प्रदर्शित केला. केतन मेहता फार काळापासून राणी लक्ष्मीवर आधारित चित्रपट काढण्याच्या प्रयत्नात आहेत. अगोदर त्यांनी ऐश्वर्या रॉयसोबत हा चित्रपट सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. असे ऐकण्यात आहे की, ते आता कंगनाला घेऊन हा चित्रपट सुरू करीत आहेत.
केतन मेहतानेही जेव्हा आमिर खानला सोबत घेऊन मंगल पांडेच्या जीवनावर चित्रपट बनविला, तर देशाच्या या महान शहिदाच्या वंशजांनी केतन मेहतावर मंगल पांडेसोबत जुळलेल्या काही सत्य घटनांना तोडूून मोडून दाखविण्याचा आरोप लावला होता आणि त्यांच्या विरोधात दावा दाखल झाला होता. हा वादही खूप गाजला