'दंगल'ची धाकड गर्ल वादात, नेटिझन्सचा पाठिंबा

By Admin | Updated: January 17, 2017 07:31 IST2017-01-16T21:14:49+5:302017-01-17T07:31:50+5:30

#ZairaWasim या हॅशटॅगसह ट्विट करत नेटिझन्सने तिची बाजू घेऊन तिला पाठिंबा दर्शवला आहे. 16 वर्षाच्या जायरा वासीमने नुकतीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली.

'Congratulations' to the girl, the support of Netizens | 'दंगल'ची धाकड गर्ल वादात, नेटिझन्सचा पाठिंबा

'दंगल'ची धाकड गर्ल वादात, नेटिझन्सचा पाठिंबा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आमिर खानच्या दंगल या चित्रपटातील लहानग्या गीताच्या रुपात दिसणारी धाकड गर्ल जायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  मात्र नेटिझन्सनी #ZairaWasim या हॅशटॅगसह  तिची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला आहे. 16 वर्षाच्या जायराने नुकतीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. यानंतर तिला सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं. मात्र, यावर तिने आपल्या वर्तणुकीबद्दल सोशल मीडियातूनच जाहीर माफी मागितली. मात्र अवघ्या काही वेळानंतर तिने हा माफीनामा सोशल मीडियावरून हटवला.
 
जायराने फेसबुक पोस्टमधील आपल्या माफीनाम्यामध्ये, ' मी नुकतेच ज्यांना भेटले, त्यांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीपुढे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते,'असं म्हटलं आहे.
 
ओमर अब्दुल्लासह अनेकांनी जायराच्या समर्थमार्थ ट्विट करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. 
 
दंगलमध्ये आमिर खानसोबत झळकलेली जायरा पुन्हा एकदा आमिरसोबत 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिक्रेट सुपरस्टारचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, यात एक मुलगी आपला आवाज जगात पोहोचावा हे स्वप्न पाहत आहे,  अशी कथा दाखवण्यात आली आहे.

 

Web Title: 'Congratulations' to the girl, the support of Netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.