संडे स्पेशलहीरोंच्या तुलनेत हीरोइनला कमी मोबदला?

By Admin | Updated: June 13, 2015 23:38 IST2015-06-13T23:38:38+5:302015-06-13T23:38:38+5:30

‘क्वीन’पाठोपाठ ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर अभिनेत्री कंगनाने हीरोंच्या तुलनेत हीरोइन्सला मिळणाऱ्या

Compared to the Sunder Specials, why did heroin get less? | संडे स्पेशलहीरोंच्या तुलनेत हीरोइनला कमी मोबदला?

संडे स्पेशलहीरोंच्या तुलनेत हीरोइनला कमी मोबदला?

‘क्वीन’पाठोपाठ ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर अभिनेत्री कंगनाने हीरोंच्या तुलनेत हीरोइन्सला मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याबाबतच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चांगलीच चर्चा झाली. ‘पीकू’ बॉक्स आॅफिसवर हिट झाल्यानंतर दीपिका पदुकोननेही याच मुद्द्याला तोंड फोडले होते. तेव्हाही याबाबतची चर्चा गाजली होती. ‘मेरी कोम’च्या यशानंतरही प्रियंका चोप्राने तसेच ‘कहानी’ आणि ‘डर्टी पिक्चर’ला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्या बालननेही हाच मुद्दा उचलून धरला होता.
महिलाप्रधान चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर मिळालेल्या प्रतिसादानंतर या हीरोइन्सही हीरोंच्या तुलनेत मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याबाबत आवाज उठविला होता. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांच्या यशाचे श्रेयही हीरोइन्सनी मिळविले होते. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, यात दुमत नाही. यावर गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. यशस्वी चित्रपट कोट्यवधींची कमाई करीत आहेत. तसेच कॉर्पोरेट समूहांसह निर्मात्यांचीही रग्गड कमाई होत असताना हीरोइन्सची ही मागणी रास्त ठरते. असे असले तरी याविषयीचा गुंता काही कमी नाही.
आर्थिक मोबदल्याचा मुद्दा निर्माता आणि कलाकार यांच्याशी संबंधित असतो. यात अन्य कोणाचीही प्रत्यक्ष भूमिका नसते. तथापि, मोठे बजेट असलेल्या चित्रपटातील कलाकारांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मोबदल्याबाबत कॉर्पोरेट घराण्यांची मोठी भूमिका असते.
कमी पैसा मिळतो, अशी हीरोइन्सची तक्रार नाही. हीरोंच्या तुलनेत कमी पैसा मिळतो, अशी त्यांची तक्रार आहे. हे खरंही आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. बॉलीवूडमधील खान मंडळी एका चित्रपटासाठी ४० कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतात, तर अग्रणी हीरोइनला दहा कोटी मोजले जातात. ही काही कमी रक्कम निश्चितच नाही; परंतु, हीरो आणि हीरोइनला मिळणाऱ्या रकमेमधील तफावत, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.
बड्या स्टार्सचे चित्रपट हीरोप्रधान असतात. या चित्रपटांत हीरोइन्सची भूमिका फक्त ग्लॅमरपुरतीच मर्यादित असते. हे चित्रपट चालले तर सारे श्रेय हीरोला जाते. आपल्या स्टारडमच्या बळावर कमकुवत चित्रपटाला
बॉक्स आॅफिसवर जो यश मिळवून देतो, तो बडा स्टार, असा समज बॉलीवूडमध्ये रूढ आहे. परंतु, नेहमी असेच घडते असे नाही. तरीही फिल्म इंडस्ट्रीजचे गणित याचभोवती फिरत असते.
उपरोक्त हीरोइन्सच्या मागणीबाबतचे गांभीर्य आणि व्यावहारिकता यात असमतोल आहे. बडे हीरो नसलेल्या आणि हीरोइनची मध्यवर्ती भूमिका असलेले चित्रपट यशस्वी झाल्यानंतरच हा सवाल उपस्थित केला जातो.
सरतेशेवटी कटू सत्य हेच की, चित्रपटातील कोणाला किती आर्थिक मोबदला द्यायचा, हे सर्वथा निर्माताच ठरवीत असतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर होणाऱ्या नफ्यात वाटेकरी करण्याची मागणी न्यायसंगत ठरते. यशाची व्याप्ती जसजशी वाढत जाईल, तसतसे फिल्म बाजाराला आर्थिक मोबदल्याबाबत हीरोइनच्या रुसव्याला सामोरे जावे लागेल. कारण मुद्दा बाजार आणि प्रतिष्ठेचा आहे.


- अनुज अलंकार

Web Title: Compared to the Sunder Specials, why did heroin get less?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.