सायली भगतचे मराठीतून कमबॅक
By Admin | Updated: October 1, 2015 02:10 IST2015-10-01T02:10:26+5:302015-10-01T02:10:26+5:30
‘मिस इंडिया युनिव्हर्स’ मानसी मोघे ‘बुगडी माझी सांडली गं’मधून, तर ‘मिस इंडिया हेरिटेज इंटरनॅशनल’ शीतल उपरे ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ चित्रपटातून मागील वर्षी मराठी चित्रपटात झळकल्या होत्या.

सायली भगतचे मराठीतून कमबॅक
‘मिस इंडिया युनिव्हर्स’ मानसी मोघे ‘बुगडी माझी सांडली गं’मधून, तर ‘मिस इंडिया हेरिटेज इंटरनॅशनल’ शीतल उपरे ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ चित्रपटातून मागील वर्षी मराठी चित्रपटात झळकल्या होत्या. आता या ‘मिस इंडिया’च्या यादीत अजून एका मराठमोळ्या मुलीची भर पडणार आहे. तिचे नाव आहे मिस इंडिया सायली भगत. सायलीने हा किताब पटकावल्यानंतर बॉलीवूड चित्रपट टे्रनम हल्ला बोल, यारियां तसेच साऊथ इंडियन चित्रपटातही काम केले आहे. मात्र, लग्नानंतरच्या मोठ्या ब्रेकनंतर आता सायली आगामी मराठी चित्रपट ‘याली’मधून ग्रँड कम बॅक करणार आहे. त्यातही खास बात म्हणजे आयपीएस आॅफिसर मीरा बोरवणकर यांच्यापासून प्रेरणा मिळालेली एटीएस म्हणजेच अँटी टेररिझम स्क्वॉड आॅफिसरच्या आव्हानात्मक भूमिकेत सायली आपल्याला दिसेल. यापूर्वी माजी आयपीएस आॅफिसर किरण बेदी यांच्या कार्यावर आधारित तेजस्विनी हा चित्रपट तयार करण्यात आला होता.