सेन्सॉर बोर्डाकडून 'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 11:02 IST2016-06-13T09:50:04+5:302016-06-13T11:02:03+5:30
सेन्सॉर बोर्डाने 'उडता पंजाब' चित्रपटातील १३ दृश्यांवर कात्री चालवत चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट दिल्याची चर्चा आहे.

सेन्सॉर बोर्डाकडून 'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट?
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - 'उडता पंजाब' चित्रपटाप्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या दृष्यकपातीवरून सुरू असलेल्या वादावर आज मुंबई उच्च न्यायालय आपला निकाल सुनावणार असतानाच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 13 दृश्यांना कात्री लावून चित्रपटाला 'ए' (प्रौढांसाठी) सर्टिफिकेट दिल्याची चर्चा रविवार संध्याकाळपासून सुरू आहे.
- शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाबप्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या दृष्यकपातीवर चांगलेच ताशेरे ओढले. ' तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे, टिव्ही असो की सिनेमा लोकांना तो पाहू द्या, प्रत्येकाला निवड करण्याचा हक्क आहे' असे सांगत खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले. याप्रकरणी न्यायालय आज (सोमवार) अंतिम निकाल देणार आहे. मात्र त्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाल 'ए' सर्टिफिकेट दिले आहे.
दरम्यान आपण या चित्रपटाच्या शीर्षकातील 'पंजाब' हा शब्द कधीच बदलायला सांगितला नव्हता असे सांगत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी घूमजाव केले आहे. ' सेन्सॉर बोर्डाच्या ९ सदस्यांनी हा चित्रपट पाहिला असून सर्वांनी मिळून या चित्रपटातील १३ दृश्यांना कात्री लावत चित्रपट 'ए'सर्टिफिकेट देऊन तो (प्रदर्शनासाठी) पास केला आहे' असे महलानी यांनी सांगितल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
'उडता पंजाब' चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाका असा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिल्याने प्रदर्शनाच्या वाटेवर असणारा हा चित्रपट अडचणीत सापडला होता.