सेलीब्रिटींचा टिवटिवाट
By Admin | Updated: May 25, 2016 03:23 IST2016-05-25T03:23:17+5:302016-05-25T03:23:17+5:30
टिष्ट्वटर आणि सेलीब्रिटी हे नाते तसे जुनेच. सध्या तर या टिष्ट्वटरला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण एक जरी वादग्रस्त टिष्ट्वट केले की लगेचच न्यूज चॅनेलवर

सेलीब्रिटींचा टिवटिवाट
टिष्ट्वटर आणि सेलीब्रिटी हे नाते तसे जुनेच. सध्या तर या टिष्ट्वटरला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण एक जरी वादग्रस्त टिष्ट्वट केले की लगेचच न्यूज चॅनेलवर त्याची हेडलाइन बनते. थोडक्यात काय तर जर चर्चेत राहायचे असेल तर टिष्ट्वट करा अन् सर्व प्रसिद्धिमाध्यमांचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घ्या. सेलीब्रिटींना हे सूत्र चांगलेच ज्ञात झाल्याने ते ट्विटरवर नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयावर वादग्रस्त टिष्ट्वट करून वाद ओढवून घेतात. मग तो सलमान खान असो, अभिजित भट्टाचार्य असो की अलीकडे टिष्ट्वटरमुळे चर्चेत असलेला अभिनेता ऋषी कपूर असो. ऋषी कपूरने या वेळेस गांधी परिवाराला लक्ष्य करताना ज्या सार्वजनिक ठिकाणांना गांधी परिवारातील सदस्यांची नावे देण्यात आली आहेत, ती त्वरित बदलावीत, असे टिष्ट्वट केले. तसेच ‘बाप का माल है क्या’ अशा शब्दांमध्ये त्याने गांधी परिवारावर राग व्यक्त करून वाद ओढवून घेतला आहे. मात्र सेलीब्रिटींकडून अशा प्रकारचे टिष्ट्वट ही पहिलीच घटना नसून यापूर्वीदेखील अनेक सेलीब्रिटींनी वादग्रस्त टिष्ट्वट केले आहेत. सध्या कमाल खान विरुद्ध अभिषेक बच्चन असे ‘टिष्ट्वटवॉर’ सुरू आहे.
सलमान खान
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या याकुब मेमनच्या समर्थनार्थ बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता सलमान खानने केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे सर्वत्र त्याचा निषेधही केला गेला. तसेच या ट्विट प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचादेखील प्रयत्न केला गेला. त्याने, ‘एक निर्दोष मेला तर माणुसकीचा खून होईल, फाशी द्यायची असेल तर टायगरला द्या, त्याच्या भावाला नको,’ असे ट्विट केले होते. त्यामुळे संपूर्ण देशभर सलमानचा निषेध केला
गेला.
कमाल खान
आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून अनेकांवर ताशेरे ओढण्यात नेहमीच आघाडीवर असलेला अभिनेता कमाल खान टिवटिवाटामुळे अनेकदा वादात अडकलेला आहे. एकदा सनी लिआॅनला टार्गेट करीत केलेल्या ट्विटमुळे तो टीकेचा धनी ठरला होता. त्याने, ‘काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या लग्नात सनी लिआॅनच्या स्ट्रीप डान्स परफॉर्मन्सच्या बदल्यात एक कोटी रु पये देण्यास तयार आहे. भारतातील लोक जर सनी लिआॅनला एक्सेप्ट करू शकतात तर प्रत्येक घरात एक पॉर्न स्टार होऊ शकते. त्यामुळे समाजाने या आजाराबाबत काळजी घ्यावी,’ असे वादग्रस्त ट्विट केले होते. कमालच्या या ट्विटनंतर नाराज झालेल्या सनी लिआॅनच्या वकिलाने कमालविरोधात तक्रार दाखल केली होती.
अभिजित भट्टाचार्य
अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील शिक्षेवरून गायक अभिजित भट्टाचार्य यांनी ट्विट करून नवा वाद निर्माण केला होता. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्याचंच मरण मरतील. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हतं, म्हणून मी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे वादग्रस्त ट्विट अभिजितने केले होते. त्यापुढेही त्याने ‘फुटपाथवर झोपण्याची फार हौस असेल, तर अशा लोकांनी गावी जावं. तिथं कोणतीही गाडी अंगावर येणार नाही, सर्वांनी सलमानच्या पाठीशी उभे राहायला हवे. रस्ते आणि फूटपाथ हे झोपण्यासाठी नसतात. त्यामुळे त्यामध्ये ड्रायव्हरचा काहीही दोष असू शकत नाही,’ असेही म्हटले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता.
अनुष्का शर्मा
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण करताना अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याकडून त्यांचे नाव चुकल्याने ती टीकेची धनी ठरली होती. तिने ‘एबीजे अब्दुल कलाम आझाद हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,’ असे ट्विट केले होते. यानंतर तिच्या या चुकीची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर वादग्रस्त टिवटिव करणारा अभिनेता कमाल खानने अनुष्का शर्माची तुलना थेट आलिया भटशी केली होती. अनुष्काने ही चूक सुधारत लगेचच नवीन ट्विट करून माफी मागितली होती.
शर्लिन चोप्रा
दिल्लीतल्या गँगरेप घटनेविरोधात संपूर्ण देश धुमसत असताना शर्लिन चोप्रा हिने यामधून स्वत:ची पब्लिसिटी करण्यासाठी वादग्रस्त ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली होती. ‘दिल्लीतील गँगरेप पीडित मुलीच्या मृत्यूवर आपला शोक व्यक्त करताना शर्लिनने ‘तुम्ही माझ्यावर बलात्कार करू शकता... माझ्यावर बलात्कार केल्यानंतर भारतातील सर्व तरु णी सुरक्षित राहणार असतील, तर मी स्वत:वर बलात्कार करवून घेण्यासही तयार आहे,’ असे वादग्रस्त ट्विट केले होते. शर्लिनच्या या ट्विटमुळे तिच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका करण्यात आली होती.
शोभा डे
प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखवणे अनिवार्य करण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मराठी चित्रपट प्राइम टाइमला दाखवण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकूमशहा प्रवृत्तीचे असल्याचे ट्विट केले होते. लेखिका शोभा डे यांच्याविरोधात विधानसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्र मक पवित्रा घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसेच डे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील केली होती. दरम्यान, डे यांनी या नोटिशीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने या प्रस्तावाला स्थगिती दिली.
- satish.dongre@lokmat.com