अक्षयचे व्यस्त वर्ष
By Admin | Updated: September 19, 2015 01:16 IST2015-09-19T01:16:35+5:302015-09-19T01:16:35+5:30
खिलाडी अक्षय कुमारचे दरवर्षी चार ते पाच सिनेमे येत असतात. २०१५-१६ हे वर्षसुद्धा अपवाद ठरणार नाही. सध्या तो ‘हाऊसफुल ३’चे शूटिंग करीत असून, त्यानंतर राजा क्रिश्नन

अक्षयचे व्यस्त वर्ष
खिलाडी अक्षय कुमारचे दरवर्षी चार ते पाच सिनेमे येत असतात. २०१५-१६ हे वर्षसुद्धा अपवाद ठरणार नाही. सध्या तो ‘हाऊसफुल ३’चे शूटिंग करीत असून, त्यानंतर राजा क्रिश्नन मेनन दिग्दर्शित ‘एअरलिफ्ट’चे राहिलेले शूटिंग पूर्ण करेल. प्रजासत्ताक दिनाला ‘एअरलिफ्ट’ प्रदर्शित होणार असून, १५ आॅगस्टला त्याच्या ‘टिनू सुरेश रुस्तम’ची हृतिकच्या ‘मोहोंजोदोडो’शी टक्कर होणार आहे. मग वर्षाशेवटी ‘नमस्ते इंग्लड’ झळणार आहे.