सिद्धार्थ मल्होत्राला हवाय कामातून ब्रेक

By Admin | Updated: October 24, 2016 02:31 IST2016-10-24T02:31:59+5:302016-10-24T02:31:59+5:30

बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफ खूपच धावपळीची असते. शूटिंगच्या शेड्युलमुळे त्यांना कधीकधी तर वेळही मिळत नाही. मग काय शूटिंगमधून ब्रेक घेऊनच आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जायचे

Breaks from Siddharth Malhotra | सिद्धार्थ मल्होत्राला हवाय कामातून ब्रेक

सिद्धार्थ मल्होत्राला हवाय कामातून ब्रेक

बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफ खूपच धावपळीची असते. शूटिंगच्या शेड्युलमुळे त्यांना कधीकधी तर वेळही मिळत नाही. मग काय शूटिंगमधून ब्रेक घेऊनच आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जायचे. असेच काही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने ठरविले आहे. शूटिंगमधून ब्रेक घेऊन न्यूझिलंडला फिरायला जाण्याचा बेत सिद्धार्थने आखला आहे. त्याला यावर्षी स्वत:साठी वेळच काढता आला नाही. यामुळे त्याने व्हॅकेशनवर जायचे ठरविले आहे. यासाठी तो कुणाची वाट पाहणार नाही. वेळ पडल्यास एकट्यानेच या सहलीचा आनंद घेण्याचे त्याने ठरविले आहे. तो म्हणतो, मी गेल्यावर्षी न्यूझिलंडला गेलो होतो. हा प्रवास आजही माझ्या आठवणीत आहे. अविश्वसनीय नैसर्गिक सौंदर्यांने नटलेल्या न्यूझिलंडमध्ये धावपळ नाही की कामाचा ताण नाही. येथे आल्यावर जगापासून फार दूर आल्यासारखे वाटते.

Web Title: Breaks from Siddharth Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.