श्रीदेवी यांना जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 15:27 IST2018-04-14T15:25:17+5:302018-04-14T15:27:33+5:30

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. यावर श्रीदेवी यांचे पती निर्माता बोनी कपूर आणि अभिनेते अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. 

Boney Kapoor express his feelings on national award announcement for sridevi | श्रीदेवी यांना जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया

श्रीदेवी यांना जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया

मुंबई - शुक्रवारी 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. यात मॉम या सिनेमासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. यावर श्रीदेवी यांचे पती निर्माता बोनी कपूर आणि अभिनेते अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. 

बोनी कपूर म्हणाले की, 'मला तिची खूप आठवण येते आहे. आज ती हवी होती. हा सन्मान तिच्यासाठी खूप महत्वाचा ठरला असता. मला नाही माहीत की, आनंदाने हसावं की तिच्या आठवणीत रडावं. आज ती असती तर खूप आनंदी झाली असती. कारण हा सिनेमा तिच्यासाठी खूप महत्वाचा होता'.  

यावेळी ते या सिनेमासंबंधी श्रीदेवी यांच्या काही आठवणींना उजाळा देत म्हणाले की, "या सिनेमाच्या विषयाने तिच्यातील आईला जागं केलं होतं. ती या सिनेमाच्या विषयाला चांगली समजली होती. कारण आमच्या मुली जान्हवी आणि खुशी तिच्यासाठी जीवन होत्या. तिला जगभरातील मुलींची चिंता होती'. 


दुसरीकडे अभिनेते अनिल कपूर यांनीही ट्वि़ट करुन लिहीले की, 'त्या भलेही आपल्यात नाहीयेत. पण त्यांचं काम, टॅलेंट आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यात राहतील. श्री आकाशातील एक तारा होती आणि नेहमी राहणार. मला माहीत आहे की, हा सन्मान त्यांच्यासाठी किती महत्वाचा होता आणि आमच्यासाठीही महत्वाचा आहे. धन्यवाद!. 
 

Web Title: Boney Kapoor express his feelings on national award announcement for sridevi