बॉँड गर्ल लवकरच बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर
By Admin | Updated: June 15, 2016 13:21 IST2016-06-15T13:15:38+5:302016-06-15T13:21:48+5:30
बाँड गर्ल म्हणून ओळखली जाणारी हॉलिवूड अभिनेत्री कॅटरीनो मुरीनो लवकरच बॉलिवुडच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

बॉँड गर्ल लवकरच बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - बाँड गर्ल म्हणून ओळखली जाणारी हॉलिवूड अभिनेत्री कॅटरीनो मुरीनो लवकरच बॉलिवुडच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. मूळची इटालियन असलेल्या कॅटरीनोने २००६ मध्ये आलेल्या जेम्स बाँण्ड चित्रपटांच्या मालिकेतील कसिनो रोयालमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.
'फिव्हर' या आगामी हिंदी चित्रपटात कॅटरीनो मुरीनो मुख्य भूमिकेत आहे. राजीव झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात राजीव खंडेलवाल आणइ गौहार खान यांची सुद्धा मुख्य भूमिका आहे. हिंदी चित्रपटात काम करणे माझे एक स्वप्न होते असे कॅटरीनने हिंदुस्थान टाईम्स वर्तमानपत्राला ई-मेलवरुन दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
जोधा अकबर, देवदास आणि सलाम बॉम्बे हे चित्रपट आपण बघितल्याचे तिने सांगितले. मी सध्या हिंदी शिकत असून, भारतीय नृत्याचे धडे घेत आहे असे कॅटरीनोने सांगितले.