बॉलिवूडची विनोद खन्नांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली

By Admin | Updated: April 27, 2017 16:19 IST2017-04-27T16:19:11+5:302017-04-27T16:19:11+5:30

बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते आणि सुपरस्टार विनोद खन्ना यांचं आज निधन झालं आहे.

Bollywood's Vinod Khanna paid tribute through Twitter | बॉलिवूडची विनोद खन्नांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली

बॉलिवूडची विनोद खन्नांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते आणि सुपरस्टार विनोद खन्ना यांचं आज निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजाराशी लढत होते. अखेर त्याचा हा लढा अयशस्वी ठरला आहे आणि त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

सोशल मीडियावर दयावान यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियावर सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत. उत्कृष्ट अभिनेता, हॅण्डसम हिरो गमावल्याचे दु:ख अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. अक्षय कुमार, वरुण धवन सारख्या अभिनेत्यांनी अतीव दुःख झाल्याच्या भावना ट्विटरच्या माध्यमातून मांडल्या आहेत. विनोद खन्ना यांनी चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात काम केले आहे.

तर अनेकांनी विनोद खन्ना प्रभावशाली अभिनेते असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीतच विनोद खन्नांवर ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे.

Web Title: Bollywood's Vinod Khanna paid tribute through Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.