कोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 14:26 IST2020-05-28T14:25:42+5:302020-05-28T14:26:32+5:30

झोयाने दुसऱ्यांदा प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले आहे. त्यासाठी तिचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे.

Zoa Morani donates plasma the second time for COVID-19 treatment TJL | कोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन 

कोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन 

बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानीने कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर आता ती दुसऱ्या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरी झाल्यानंतर आता झोयाने 20 दिवसात आता दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यामुळे आता इतर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जाऊ शकेल. तिने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

झोयाने सोशल मीडियावर प्लाझ्मा डोनेशनचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करुन झोया म्हणाली की, 'प्लाझ्मा डोनेशन राऊंड 2. मागील वेळी याने एका रुग्णाला आयसीयुमधून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. माझ्या डॉक्टरकडून एक नोट- आशा आहे की, नीट झालेले सर्व रुग्ण मदतीसाठी पुढे येतील.


झोयाने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्लाझ्मा डोनेट केल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे.

झोया मोरानी ही शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा चेन्नई एक्सप्रेसचे प्रोड्युसर करीम मोरानी यांची मुलगी आहे.

तिची बहिण शाजा मोरानी आणि वडिल करीम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तिघांनीही यावर मात केली आहे. 

 

Web Title: Zoa Morani donates plasma the second time for COVID-19 treatment TJL