झीनत अमान यांच्या डोळ्याची झाली सर्जरी, ४० वर्षांपासून होता त्रास; म्हणाल्या, 'लोक गॉसिप...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:07 PM2023-11-08T12:07:48+5:302023-11-08T12:08:44+5:30

झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे

Zeenat Aman underwent eye surgery suffering for 40 years people used to gossip about it | झीनत अमान यांच्या डोळ्याची झाली सर्जरी, ४० वर्षांपासून होता त्रास; म्हणाल्या, 'लोक गॉसिप...'

झीनत अमान यांच्या डोळ्याची झाली सर्जरी, ४० वर्षांपासून होता त्रास; म्हणाल्या, 'लोक गॉसिप...'

70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) सध्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर आल्यापासून त्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स देत असतात. त्याच्या करिअरमधील जुन्या आठवणी शेअर करत असतात. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने चाहते चिंतेत पडले आहेत. त्यांनी आपल्या पापण्यांची सर्जरी करुन घेतली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या एका जखमेमुळे त्यांची दृष्टी कमजोर झाली होती. 

झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, "१८ मे रोजी मी व्होग इंडियासाठी शूट केलं. तर १९ मे रोजी मी सकाळी लवकर उठले आणि लिलीला किस केले. मग जहान आणि कारा मला खारच्या हिंदूजा रुग्णालयात घेऊन गेले. ४० वर्षांपासून मी या आजाराचा सामना करत आहे. आता याला मूळापासून उपटून काढण्याची गरज आहे. मला Ptosis चा आजार आहे. एकदा मला झालेल्या जखमेमुळे ही वेळ आली. बऱ्याच वर्षांपूर्वी मला जखम झाली होती. यामुळेच माझ्या उजव्या डोळ्याचे मसल्स डॅमेज झाले. यामुळेच गेली बरेच वर्ष माझ्या पापण्या हळहळू लटकत होत्या."

त्या पुढे लिहितात, "मला यामुळे बघायला अडचणी येत होत्या.म्हणूनच मला अनेकदा मला नावंही ठेवली गेली होती. माझ्याबद्दल गॉसिप व्हायचे पण मला कधी फरक पडला नाही. तेव्हाही बरेच उपचार केले पण काहीच झालं नाही. पण आता तंत्रज्ञान प्रगत झालं आहे त्यामुळे ही सर्जरी यशस्वी झाली. मला आता नीट दिसत आहे. तसंच हे ऑपरेशन करणं कठीण होतं. माझं शरीर बर्फाने जखडलं गेलं होतं. मी थरथर कापत होते. पण माझा मुलगा जहान माझ्यासोबत होता. त्याने मला शांत केलं."

Web Title: Zeenat Aman underwent eye surgery suffering for 40 years people used to gossip about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.