पैसेही संपले, कामही मिळेना अशी दयनीय अवस्था झाली झरीन खानची, दिग्दर्शक मागताहेत हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:52 IST2020-08-26T17:52:21+5:302020-08-26T17:52:41+5:30
बॉलिवूडची अभिनेत्री झरीन खान सध्या आर्थिक संकटात आहे. उदरनिर्वाहासाठीदेखील तिच्याकडे पैसे नाहीत.

पैसेही संपले, कामही मिळेना अशी दयनीय अवस्था झाली झरीन खानची, दिग्दर्शक मागताहेत हॉट फोटो
बॉलिवूडची अभिनेत्री झरीन खान सध्या आर्थिक संकटात आहे. उदरनिर्वाहासाठीदेखील तिच्याकडे पैसे नाहीत. लॉकडाउनमुळे तिची दयनीय अवस्था झाली आहे. झरीन म्हणाली की, लॉकडाउनमुळे तिचे खूप नुकसान झाले आहे आणि आता तिला सलमान खानवर ओझे बनायचे नाही. घरात कमावणारी ती एकटीच आहे आणि या अडचणीच्या काळात काय करायचं, असा प्रश्न तिला पडला आहे.
झरीन खानने सांगितले की, मला चित्रपट आणि सीरिजसाठी ऑफर येत आहे पण सगळे हॉट आणि ग्लॅमरस फोटो मागत आहेत. त्यामुळे मी कित्येक ऑफर नाकारल्या. चांगल्या ऑफरची वाट पाहत आहे. अद्याप एकही चांगली ऑफर मिळाली नाही.
झरीन खानने सलमान खान अभिनीत वीर चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर झरीन खान बोल्ड सिनेमांकडे वळली. तिथे तिचे चित्रपट हिट झाले.
ती पुढे म्हणाली की, मोठ्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्याच कलाकारांना घेऊन चित्रपट रिलीज करण्याकडे जास्त कल दिसतो आहे. तिने लॉकडाउनमध्ये आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले.
ती म्हणाली की, आता तिचा बँक बॅलन्स संपला आहे आणि गरीब झाले आहे. आता मला सलमान खानला त्रास द्यायचा नाही.