येत्या २७ नोव्हेंबरला जहीर खान अन् सागरिका घाटगे करणार कोर्ट मॅरेज, नंतर देणार ग्रॅण्ड रिसेप्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 19:38 IST2017-11-08T14:08:14+5:302017-11-08T19:38:14+5:30
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते खूपच जुने आहे. कारण असे बºयाचदा घडले आहे की, दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या संगिनींची निवड ...

येत्या २७ नोव्हेंबरला जहीर खान अन् सागरिका घाटगे करणार कोर्ट मॅरेज, नंतर देणार ग्रॅण्ड रिसेप्शन!
क रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते खूपच जुने आहे. कारण असे बºयाचदा घडले आहे की, दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या संगिनींची निवड बॉलिवूडमधून केली आहे. हरभजन सिंग-गीता बसरा, युवराज सिंग-हेजल या नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्यांचे उदाहरण देता येईल. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता जहीर खान आणि सागरिका घाटगे विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. होय, काही महिन्यांपूर्वीच सागरिका आणि जहीर खानने त्यांच्यातील नात्यांचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही उरकला. आता लवकरच दोघांच्या घरी सनईचौघडे वाजणार आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी दोघेही विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र ही सर्व प्रक्रिया कोर्टात पार पडणार आहे. होय, दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सागरिका एका रॉयल परिवारातून आहे. अशातही जहीर खान तिच्यासोबत २७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे रजिस्टर्ड मॅरेज करणार आहे. त्यानंतर मुंबईतच एका ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजनही करण्यात आले आहे. हे रिसेप्शन मुंबईतील कुलाबा येथील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी दोघांच्या गेस्टला आमंत्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत सागरिकाला ‘चक दे गर्ल’च्या अवतारात बघण्यात आले होते, आता तिचे चाहते नववधूच्या रूपात बघण्यात आतुर आहेत. उपलब्ध माहितीनुसार सागरिका तिच्या लग्नात सभ्यसांचीचा गोल्डन लेहंगा परिधान करणार आहे.
‘चक दे इंडिया’ या चित्रपटात सागरिका शाहरुख खान याच्यासोबत बघावयास मिळाली होती. या भूमिकेसाठी तिला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला होता. याव्यतिरिक्त सागरिकाने ‘दिलदारियां’ या पंजाबी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. सागरिकाने काही काळापूर्वीच तिच्या रिलेशनशिपविषयीचा उलगडा केला होता. आता हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.