सोनाक्षी सिन्हाच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला- तू नेहमीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:33 IST2023-06-03T13:27:25+5:302023-06-03T13:33:52+5:30

सोनाक्षी सिन्हाच्याने नुकताच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोनाचा कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालने तिच्यासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

zaheer iqbal says i love you to sonakshi sinha rumor boyfriend wishes her on birthday | सोनाक्षी सिन्हाच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला- तू नेहमीच...

सोनाक्षी सिन्हाच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला- तू नेहमीच...

सोनाक्षी सिन्हाच्याने नुकताच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोनाचा कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालने तिच्यासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. ऐवढंच नाही तर खुल्लम खुल्ला आपलं प्रेमही जाहिर केलं. 

 जहीर आणि सोनाक्षी दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यामुळे अर्थात वाढदिवसानिमित्त जहीरने केलेली ही पोस्ट सोनाक्षीसाठी खूप खास होती. आता ही पोस्ट समोर आल्यानंतर, सोनाक्षी आणि जहीरच्या नात्याची ही अधिकृत घोषणा असल्याचे चाहते म्हणतायेत. 

जहीरने सोनाक्षी सिन्हासोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. तू नेहमीच माझ्यावर अवलंबून राहू शकते. तू बेस्ट आहेस." तुला जगातील सर्व सुख मिळो, नेहमी आनंदी राहो. मी तुझ्यावर प्रेम करतो." सोनाक्षीने जहीरची ही पोस्ट पाहिली आणि प्रतिक्रिया दिली. सोनाक्षी जहीरच्या या पोस्टवर खूप सारे हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. 

जहीर इक्बालने नोटबूक सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्य केला. सलमान खानच्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि मग दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. यानंतर दोघांनी डबल एक्सएल चित्रपटात एकत्र काम केले. अलीकडे अभिनेत्री सोनाक्षीनेची दहाड  ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
 

Web Title: zaheer iqbal says i love you to sonakshi sinha rumor boyfriend wishes her on birthday