युजवेंद्र चहलच्या पत्नीची 'लव सेक्स और धोखा २'मध्ये एन्ट्री, 'कमसिन कली'वर दिसणार थिरकताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:27 IST2024-04-04T16:26:21+5:302024-04-04T16:27:15+5:30

Love Sex Aur Dhokha 2: 'लव्ह सेक्स और धोखा २' मधील कमसिन कली या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे.

Yuzvendra Chahal's wife's entry in 'Love Sex Aur Dhoka 2', to be seen in 'Kamsin Kali' | युजवेंद्र चहलच्या पत्नीची 'लव सेक्स और धोखा २'मध्ये एन्ट्री, 'कमसिन कली'वर दिसणार थिरकताना

युजवेंद्र चहलच्या पत्नीची 'लव सेक्स और धोखा २'मध्ये एन्ट्री, 'कमसिन कली'वर दिसणार थिरकताना

'लव्ह सेक्स और धोखा २' (Love Sex Aur Dhokha 2) बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांना वेड लावणारे मोहक पोस्टर रिलीज केल्यानंतर, निर्मात्यांनी प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी 'लव्ह सेक्स और धोखा २'चा पहिला डोस रिलीज करून मनोरंजक, बोल्ड आणि आकर्षक जगाची झलक दाखवली आहे. लव्ह सेक्स और धोखा या चित्रपटातील गाणी नेहमीच महत्त्वाचा भाग राहिली आहेत आणि त्यांनी चित्रपटासाठी एक आगळे-वेगळे पण परिपूर्ण वातावरण निर्माण केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गोष्टीचा परिणाम चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि नंतर दिसून येतो. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये येणाऱ्या गाण्यांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे आणि हे लक्षात घेऊन निर्माते ‘कमसिन कली’ या पहिल्या गाण्याने त्यांचा म्युझिकल प्रवास सुरू करण्यास सज्ज झाले आहेत.

'लव्ह सेक्स और धोखा २' मधील कमसिन कली या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या गाण्यात टोनी कक्कर आणि धनश्री एकदम दमदार अंदाजात दिसत आहेत. हे गाणे टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे आणि गाण्याचे बोल टोनी कक्कर यांनीच लिहिले आहेत.

गाण्यात टोनीचा स्वॅग पाहायला मिळतो आहे तर धनश्री वर्माच्या डान्स मुव्ह्जने या गाण्याला चारचाँद लावले आहेत. गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा द्विगुणित केली आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ५ एप्रिलला या गाण्याच्या रिलीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव्ह सेक्स और धोखा २' चित्रपट १९ एप्रिल, २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Yuzvendra Chahal's wife's entry in 'Love Sex Aur Dhoka 2', to be seen in 'Kamsin Kali'