घटस्फोटानंतर १० महिन्यांनी चहल-धनश्री एकत्र येणार? काय आहे कारण? चाहत्यांमध्ये उत्सुकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:43 IST2026-01-08T12:43:05+5:302026-01-08T12:43:47+5:30
मार्च २०२५ मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतल्यानंतर, हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

घटस्फोटानंतर १० महिन्यांनी चहल-धनश्री एकत्र येणार? काय आहे कारण? चाहत्यांमध्ये उत्सुकता!
Yuzvendra Chahal & Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मार्च २०२५ मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतल्यानंतर, हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. एका आगामी टीव्ही रिअॅलिटी शोमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
'बॉम्बे टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर 'द फिफ्टी' नावाचा एक नवा रिअॅलिटी शो लवकरच सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान करणार असून, यात विविध क्षेत्रातील ५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांचीही नावे असल्याची चर्चा आहे.
युजवेंद्र आणि धनश्री २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान भेटले होते आणि डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. धनश्रीने इंस्टाग्रामवरून 'चहल' आडनाव काढून टाकल्यानंतर या अफवांना अधिक जोर मिळाला. अखेर, सुमारे साडेचार वर्षांच्या संसारानंतर मार्च २०२५ मध्ये हे जोडपे कायदेशीररित्या वेगळे झाले.
घटस्फोटाला १० महिने उलटल्यानंतर आता हे दोघे 'द फिफ्टी' या शोच्या निमित्ताने पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी, खेळाडू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश असणार आहे. धनश्रीने यापूर्वी 'झलक दिखला जा' आणि 'राईज अँड फॉल' सारख्या शोमध्ये आपला जलवा दाखवला आहे. तर चहलसाठी हा पहिलाच मोठा रिअॅलिटी शो ठरू शकतो.