​युलियाने केली सावरासावर ; म्हणे, भारतातून परत जाताना मी रडत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 20:02 IST2016-12-04T20:02:06+5:302016-12-04T20:02:06+5:30

सलमान खानची कथित प्रेयसी युलिया वंतूरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये भारत हा विचित्र संस्कृती असलेला देश असा उल्लेख केला ...

Yulia Kelly Sawasawar; That is, I was crying while returning from India | ​युलियाने केली सावरासावर ; म्हणे, भारतातून परत जाताना मी रडत होते

​युलियाने केली सावरासावर ; म्हणे, भारतातून परत जाताना मी रडत होते

ong>सलमान खानची कथित प्रेयसी युलिया वंतूरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये भारत हा विचित्र संस्कृती असलेला देश असा उल्लेख केला होता. यावर तिने सावरासावर करताना खुलासा दिला आहे. युलिया म्हणाली, भारतातून मायदेशी परत जाताना मला रडू कोसळले होते. 

हिमेश रेशमिया याच्यासह गायलेल्या हिंदी गाण्याच्या टीझर लाँचिग प्रसंगी ती प्रश्नांना उत्तरे देत होती. युलिया मायदेशातून भारतात परतल्यावर तिने एका रोमानियन संकेतस्थळाला मुलाखत दिली होती. मुलाखतीत युलियाने, भारतात कामाबद्दल बोलण्यापेक्षा इथे लोक माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच अधिक बोलतात. भारतीयांची मानसिकता ही पूर्णपणे वेगळी आहे. इथली संस्कृती, इथले लोक सगळंच वेगळं आहे. इथे तुम्हाला फार एकांत मिळत नाही. कारण एकाच घरात खूप लोकं राहतात. याशिवाय इथे विचारपूर्वक कपडे वापरावे लागतात. असेही युुलिया हिने सांगितले होते. यावर तिने आपला खुलासा दिला. 

युलिया म्हणाली, प्रामाणिकपणे सांगते, मी जेव्हा भारतातून परत जाते होते तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. कारण हा देश मला सोडावासा वाटत नव्हता, मला येथे जे मिळाले त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी एका मुलाखतीमध्ये भारतीय संस्कृती विचित्र आहे असे म्हणाली होती हे चुकीचे आहे. मी स्पष्ट करते मला भारत आवडतो, येथील लोक मला आवडतात, मी येथे अनेक लोकांशी भेटले. हिमेशने मला संधी दिली. मी त्याची आभारी आहे, अशा व्यक्तींबद्दल मी काय विचार करू शकते, असेही युलिया म्हणाली. 

३६ वर्षीय रोमानियन टीव्ही स्टार युलिया बॉलिवूडमध्ये संधी शोधण्यासाठी दोन वर्षांआधी भारतात आली होती. तेव्हापासून ती सलमान खानच्या संपर्कात असून दोघेही विवाह करणार असल्याच्या जोरदार चर्चा मधल्या काळात होत्या. 

Iulia Vantur clarify, I cried when I left India

Web Title: Yulia Kelly Sawasawar; That is, I was crying while returning from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.