'तुझं करिअर बर्बाद होईल...', करीना कपूरला सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी मिळाली होती ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 09:14 AM2023-07-17T09:14:56+5:302023-07-17T09:15:12+5:30

Saif Ali Khan - Kareena Kapoor : अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ आणि करीना यांच्यात २००८ मध्ये जवळीक वाढली. सैफ-करीना 'टशन' चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

'Your career will be ruined...', Kareena Kapoor was warned before marrying Saif Ali Khan | 'तुझं करिअर बर्बाद होईल...', करीना कपूरला सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी मिळाली होती ताकीद

'तुझं करिअर बर्बाद होईल...', करीना कपूरला सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी मिळाली होती ताकीद

googlenewsNext

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचे लग्नापर्यंत अफेअर खूप चर्चेत होते. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी १९९१ मध्ये सैफ अली खानने अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. सैफचे पहिले लग्नही खूप चर्चेत आले होते. खरे तर लग्नाच्या वेळी अमृता इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असताना सैफने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केले नव्हते. मात्र, लग्नाच्या १३ वर्षानंतर सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००८ मध्ये अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ आणि करीना यांच्यात जवळीक वाढली होती.

खरेतर सैफ आणि करीना 'टशन' चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, करीनाच्या म्हणण्यानुसार, सैफसोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. बेबोनं एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफसोबत लग्न करण्यापूर्वी तिच्या आजूबाजूच्या लोकांनी काय सांगितले होते. करीनाला लोकांनी तिला सांगितले की, 'सैफ दोन मुलांचा बाप आहे आणि त्याच्याशी लग्न केल्याने तुझे करिअर बर्बाद होईल'. करीनाच्या म्हणण्यानुसार, लोकांकडून हे ऐकल्यानंतर तिला वाटले की, प्रेमात पडणे हा एवढा मोठा गुन्हा आहे का? जर होय, तर लग्न करूया आणि पुढे काय होते ते पाहूया!


दरम्यान, आज करीना आणि सैफचं नाव इंडस्ट्रीतील पॉवर कपल्समध्ये सामील झाले आहे. करीना आणि सैफला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुले आहेत.

Web Title: 'Your career will be ruined...', Kareena Kapoor was warned before marrying Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.