जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 09:25 IST2023-02-28T09:25:28+5:302023-02-28T09:25:55+5:30

Riteish Deshmukh And Genelia D'souza-Deshmukh : रितेश-जिनिलिया बऱ्याचदा त्यांच्या मुलांसोबत विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

You won..! First the boys then Ritesh-Genelia joined hands; The video is going viral | जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल

जिंकलंस..! आधी मुलांनी मग रितेश-जिनिलियानं जोडले हात; व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता रितेश देशमुख व जिनिलिया (Riteish Deshmukh And Genelia D'souza-Deshmukh) यांचा नुकताच वेड मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. ते दोघे प्रोफेशनल लाइफसोबत त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. रितेश-जिनिलियाची मुलं कायमच माध्यमांसमोर आल्यावर फोटोग्राफर्सना पाहून हात जोडताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रितेश-जिनिलिया बऱ्याचदा त्यांच्या मुलांसोबत विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते विमानतळावर दिसत आहेत. फोटोग्राफर्संना पाहून त्यांच्या मुलांनी हात जोडले. त्यानंतर आई वडिलांनीदेखील हात जोडले. जिनिलियाने फोटोग्राफर्सचे आभार मानले. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहले की, बॉलिवूडमधील टॉपची जोडी आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, खूप सुंदर जोडी अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. 


पापाराझींना पाहून दोन्ही मुले हात का जोडतात, यावर रितेश देशमुखने खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, एकदा मला माझ्या मुलांनी विचारले, ते तुमचे फोटो का काढतात? त्यावर मी त्यांना म्हणालो की, तुमचे आई-बाबा जे काम करतात त्यासाठी ते येऊन आमचे फोटो काढतात. तुम्ही आमची मुले आहात. त्यामुळे तुमचेही फोटो काढले जातात. म्हणून तुम्ही फक्त हात जोडून त्यांचे आभार मानायचे. आत्तापर्यंत तुम्ही असे काहीही मिळवलेले नाही की ज्यामुळे तुमचे फोटो काढले जावेत. तरीही ते येऊन तुमचे फोटो काढतात. त्याबद्दल तुम्ही त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणायचे. 


अभिनेता पुढे म्हणाला की, माझे हे म्हणणं त्यांना पटलं आणि ते म्हणाले की, हो बाबा आम्ही त्यांचे हात जोडून आभार मानू आणि तेव्हापासून ते फोटोग्राफर्स आणि मीडियासमोर आल्यावर सर्वांना हात जोडून नमस्कार करतात.

Web Title: You won..! First the boys then Ritesh-Genelia joined hands; The video is going viral