'मैने प्यार किया' सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीला करावे लागले होते तडकाफडकी लग्न, कारण वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:26 IST2020-09-04T16:25:40+5:302020-09-04T16:26:10+5:30

1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय दासानीशी लग्न केले आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

You Will Be Shocked To Know Maine Pyar Kiya Actress Bhagyashree Became Pregnant Before Marriage | 'मैने प्यार किया' सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीला करावे लागले होते तडकाफडकी लग्न, कारण वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

'मैने प्यार किया' सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीला करावे लागले होते तडकाफडकी लग्न, कारण वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाने भाग्यश्रीला एका रात्रीत स्टार बनवले. मैने प्यार किया प्रदर्शित झाला तेव्हा भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.

 'मैने प्यार किया' या सिनेमा प्रदर्शित होऊन ३० वर्षाहूनही अधिक काळ लोटला असला तरी आजही सिनेमा आठवताच भाग्यश्री आणि समलान ही जोडी आठव्याशिवाय राहत नाही. भाग्यश्रीने सिनेमापूर्वी 'कच्ची धूप', 'होनी अनहोनी' आणि 'किस्से मियां बीबी के' या मालिकांमध्ये अभिनय केला होता. मात्र एकाच सिनेमातून भरघोस मिळालेले यश  भाग्यश्री फार काळ जपू शकली नाही. 

आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत भाग्यश्रीने यशस्वी करिअरवर पाणी सोडले. भाग्यश्रीने इतक्या लवकरच लग्न करत बॉलिवूडपासून दूर जाण्याचे कारण काय या मागे वेगवेगळे कारण आजही चर्चेत असतात. त्यापैकी एक कारण ऐकून अनेकांना विश्वाच बसत नाही. 'मैंने प्यार किया' सिनेमात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी भाग्यश्री वयाच्या 17 व्या वर्षी आई झाली. लग्नाआधीच ती गरोदर राहिली असल्याचे बोलले जाते.

1990  मध्ये भाग्यश्रीने हिमालय दासानीशी लग्न केले आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आज भाग्यश्री 2 मुलांची आई आहे. त्यांना 23 वर्षांचा मुलगा अभिमन्यू आणि 21 वर्षांची मुलगी अवंतिका असे तिच्या मुलांची नावं आहेत. लग्नाआधीच ती गर्भवती राहिल्यामुळे  हिमालय दासानीशी लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला. बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरीही भाग्यश्री आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करते.

Web Title: You Will Be Shocked To Know Maine Pyar Kiya Actress Bhagyashree Became Pregnant Before Marriage