हे बंगाली चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहूच शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 15:14 IST2018-01-30T09:44:37+5:302018-01-30T15:14:37+5:30
चित्रपटात बोल्ड दृश्य असणे किंवा एखाद्या अभिनेत्रीने अंग प्रदर्शन करणे हे नवीन नाहीये. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आपल्याला अशाप्रकारचे दृश्य ...

हे बंगाली चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहूच शकत नाही
च त्रपटात बोल्ड दृश्य असणे किंवा एखाद्या अभिनेत्रीने अंग प्रदर्शन करणे हे नवीन नाहीये. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आपल्याला अशाप्रकारचे दृश्य पाहायला मिळतात. सनी लियोनीने तर मस्तीजादे या चित्रपटात एक न्यूड सीन देखील दिला होता. तिच्याआधी अनेक अभिनेत्रींनी, अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये न्यूड सीन दिले आहेत. मेरा नाम जोकर या चित्रपटात सीमी गरेवालने दिलेल्या न्यूड सीनची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने देखील केतन मेहता यांच्या माया मेमसाब या चित्रपटात न्यूड सीन दिला होता. शाहरुखचा हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. शायनी आहुजाने देखील सीन्स या चित्रपटात अनेक न्यूड सीन दिले होते. या सगळ्यामुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला होता. आजवर बोल्ड दृश्यांमुळे बॉलिवूडमधील अनेक चित्रपट चर्चेत आले आहेत.
बॉलिवूड पेक्षा बंगाली चित्रपट हे बोल्ड आणि न्यूड दृश्याच्या बाबतीत अतिशय प्रगत आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण अनेक बंगाली चित्रपटात बोल्ड दृश्य आणि न्यूड दृश्यांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. चात्रक या एका बंगाली चित्रपटात पाऊली दामने अनुब्रत बसू या अभिनेत्या सोबत अनेक बोल्ड दृश्य दिले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण या चित्रपटातील सगळी दृश्यं ही खरीखुरी होती. पाऊली आणि अनुब्रतने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी खराखुरा सेक्स करून बंगाली चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट विमुक्ती जयसुन्द्रा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले होते. कास्मिक सेक्स या बंगाली चित्रपटातही अनेक बोल्ड दृश्यांचा भडिमार होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान देखील या चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी खराखुरा सेक्स केला असल्याची चर्चा रंगली होती. गांडू या बंगाली चित्रपटातील बोल्ड कंटेटमुळे तर या चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आली होती.