"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:11 IST2025-11-17T11:11:09+5:302025-11-17T11:11:30+5:30
Kareena Kapoor : करीना कपूर बॉलिवूडमधील पहिले चित्रपट कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर घराण्याशी संबंधित आहे. सिने पार्श्वभूमीतून येण्याचे फायदे काय आहेत याबद्दल करीना नेहमीच स्पष्टपणे बोलत आली आहे. परंतु आता तिने नेपोटिझ्मवर आपलं मत मांडलं आहे.

"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर नेपोटिझ्मवरील चर्चेतून कधीच पळ काढत नाही आणि तिने नेहमीच हे मान्य केले आहे की, तिला एका फिल्मी कुटुंबात जन्म घेण्याचे भाग्य लाभले, ज्यामुळे तिच्यासाठी अनेक मार्ग खुले झाले. मात्र, नेपोटिझ्मवर तिचे दुसरे मतही आहे. ती म्हणते की, नेपोटिझ्म तुमच्यासाठी इंडस्ट्रीचे दरवाजे उघडू शकतो, पण तुम्ही येथे टिकून राहाल की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
करीना मानते की, ती नशीबवान आहे की, ती चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. परंतु तिचे हे देखील मत आहे की या इंडस्ट्रीत टॅलेंट, मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय कोणीही टिकू शकत नाही. नुकत्याच बरखा दत्त लिखित वी द वीमेनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत, करीना कपूरने नेपोटिझ्मवरील चर्चेबद्दल बोलताना सांगितले, "नेपोटिझम तुम्हाला पदार्पण देऊ शकतो, आयुष्यभराची कारकीर्द नाही. प्रेक्षकांचे प्रेमच तुमचे नशीब ठरवते, तुमचे आडनाव नाही."
आदर जैन म्हणाला...
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरच्या चुलत भावाने आदर जैननेही याबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला होता, ''लोक घराणेशाहीवर चर्चा करतात, पण मला त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. होय, मी राज कपूर यांचा नातू आणि करीना व रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी वर्षाला ५० चित्रपट करेन किंवा सतत ब्रँड डील्स आणि एंडोर्समेंटवर सही करेन. याबाबतीत मी घराणेशाहीचा बळी ठरलो नाहीये.''
करीना कपूरचे वर्कफ्रंट
करीना कपूर शेवटची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स फ्रँचायझीच्या पाचव्या चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये अवनी कामतच्या भूमिकेत दिसली होती. रोहित शेट्टीने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, ज्यात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आता ती नेटफ्लिक्सच्या 'डायनिंग विथ द कपूर्स' या डॉक्युमेंट्रीमध्ये दिसणार आहे. या डॉक्युमेंट्रीचा प्रीमियर २१ नोव्हेंबरला होणार आहे. ही डॉक्युमेंट्री अरमान जैनने बनवली आहे, जो याचा निर्माताही आहे. याचे दिग्दर्शन स्मृती मुंद्रा यांनी केले आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रीमियर होणाऱ्या 'डायनिंग विथ द कपूर्स'मध्ये कुटुंबातील अनेक सदस्य सामील आहेत, ज्यात रणधीर कपूर, रीमा जैन, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, मनोज जैन, निताशा नंदा, भरत साहनी, आधार जैन, अनीसा मल्होत्रा जैन, अगस्त्य नंदा, नव्या नवेली नंदा, कुणाल कपूर, जहान कपूर, शायरा कपूर, नमिता कपूर, कंचन देसाई, जतिन पृथ्वीराज कपूर आणि पूजा देसाई यांचा समावेश आहे.