यंदा स्टार्सवर लागला आहे कोट्यावधी पैसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:00 IST2019-01-06T21:00:00+5:302019-01-06T21:00:02+5:30
यंदा मात्र डायरेक्टर्सने चित्रपटांच्या यशाची जबाबदारी मेल अॅक्टर्सवर दिली असून त्यांच्यावर कोट्यवधी पैसाही लावला आहे.

यंदा स्टार्सवर लागला आहे कोट्यावधी पैसा!
-रवींद्र मोरे
२०१८ बॉलिवूडसाठी नवीन कथानक आणि नव्या स्टार्सचे वर्ष ठरले, तर २०१९ देखील याबाबतीत बऱ्याच अपेक्षांनी भरलेले दिसत आहे. यावर्षी बरेच बिग बजेट चित्रपट बघावयास मिळणार आहेत, शिवाय लहान चित्रपटातही उत्कृष्ट कथानक दिसणार आहे. यंदा मात्र डायरेक्टर्सने चित्रपटांच्या यशाची जबाबदारी मेल अॅक्टर्सवर दिली असून त्यांच्यावर कोट्यवधी पैसाही लावला आहे. जाणून घेऊया की, कोणत्या स्टार्सवर किती पैसा लावला आहे डायरेक्टर्सनी...
* अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर यंदा बॉलिवूडने सर्वात मोठा डाव लावला आहे. सुपरहिट चित्रपटांची मेजवानी देणारा अक्षय यावर्षी ‘केसरी’, ‘हाउसफुल 4’, ‘गुड न्यूज’ आणि ‘मिशन मंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांचा बजेट सुमारे ३४० कोटी असून अक्षय या यादीत पहिल्या रॅँकला आहे.
* रणबीर कपूर
रणबीर कपूरनेही गेल्या काही वर्षात काही हिट तर काही सुपरहिट चित्रपट देत आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्यावर्षी तर त्याच्या ‘संजू’ चित्रपटाने कमालच केली. याच धर्तीवर रणबीरवर यंदा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयाचा डाव खेळण्यात आला असून तो दुसऱ्या रॅँकवर आहे. यात रणबीर आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
* सलमान खान
बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानवरही यंदा ‘भारत’ चित्रपटाच्या माध्यमातून १८० कोटी लावण्यात आले आहेत. भारतची शूटिंग सुरु असून वेगळा आशयघन असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे. या बजेटनुसार सलमान या यादीत तीसऱ्या रॅँकवर आहे.
* अर्जुन कपूर
अर्जुन कपूर या यादीत चौथ्या रॅँकवर असून ‘संदीप और पिंकी फरार', 'पानीपत' आणि 'इंडियाज मोस्ट वांटेड' या चित्रपटांच्या माध्यमातून अर्जुनवर सुमारे १०५ कोटीचा डाव खेळण्यात आला आहे. अर्जुन गेल्या वर्षी आपणास काही चित्रपटांमध्ये दिसला, मात्र फारशी कमाल करु शकला नाही. पण यावेळी तो कमाल करु शकेल अशी अपेक्षा आहे.
* सुशांत सिंह राजपूत
सुशांत आपणास यावषी ‘सोनचिडिया’ या चित्रपटात दिसणार असून तो एका डाकूची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुशांतनेही या अगोदर अनके सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ तर सुपरड्यूपर हिट ठरला होता. यावर्षी सोनचिडियाच्या माध्यमातून त्याच्यावर २६ कोटी लावण्यात आले असून तो पाचव्या रॅँकला आहे.