World Dance Day : मीशाचा डॅडी शाहिद कपूरबरोबरचा डान्स तुम्ही बघितला काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 18:36 IST2017-04-29T13:05:59+5:302017-04-29T18:36:13+5:30
आज संपूर्ण जग ‘डान्स डे’ सेलिब्रेट करीत आहे. मात्र अभिनेता शाहिद कपूर याने हा दिवस अतिशय हटके पद्धतीने सेलिब्रेट केला आहे.
World Dance Day : मीशाचा डॅडी शाहिद कपूरबरोबरचा डान्स तुम्ही बघितला काय?
आ संपूर्ण जग ‘डान्स डे’ सेलिब्रेट करीत आहे. मात्र अभिनेता शाहिद कपूर याने हा दिवस अतिशय हटके पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. त्याने मुलगी मीशा हिच्याबरोबर डान्स डे साजरा केला आहे. होय, शाहिदने मुलगी मीशाबरोबरच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यात शाहिदपेक्षाही मीशाचा डान्स बघण्यासारखा आहे. आपल्या डॅडीवर थिरकणारी मिशा खूपच क्युट दिसत असून, तिचा डान्स बघून कोणीही तिच्या प्रेमात पडावे असा हा व्हिडिओ आहे.
खरं तर हा व्हिडिओ बघून कोणालाही शाहिद आणि मीशाबरोबर डान्स करण्याचा मोह होईल. या व्हिडिओमध्ये दोघेही मायकल जॅक्शनच्या गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळत आहेत. शाहिदबरोबर मीशाही डान्सचा चांगलाच आनंद घेत आहे. शाहिदने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘एमजे डान्स तुमच्या रक्तात आहे.’ काही दिवसांपूर्वीच शाहिदने मीशाबरोबरच एक स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचा फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये मीशा डॅडी शाहिदबरोबर मस्ती करताना बघावयास मिळत होती.
२०१५ मध्ये शाहिदने दिल्लीचीच रहिवासी असलेल्या मीरा राजपूत हिच्याशी विवाह केला होता. गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये मीशाचा जन्म झाला. मीशाच्या जन्मानंतर प्रत्येकाला तिच्या एका झलकची आतुरता लागली होती. कारण सुरुवातीचे काही दिवस शाहिद आणि मीराने मीशाला मीडियापासून दूर ठेवले होते. त्यानंतर मीशाचा एक फोटो शाहिदने शेअर केला. त्यावेळी हा फोटो खूपच व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा शाहिदने मीशाबरोबरचा एक बाथटबमधील फोटो शेअर केला. या फोटोलादेखील त्याच्या फॅन्सकडून प्रचंड लाइक्स मिळाले.
बॉलिवूडमध्ये ‘इश्क-विश्क’ या चित्रपटातून डेब्यू करणाºया शाहिदने कॉरिओग्राफर शामक डावर याच्या इन्सिट्यूटमध्ये डान्सचे धडे घेतले आहेत. शाहिद सध्या संंजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागली आहे. कारण हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात अडकला आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.