निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 10:11 IST2023-11-20T10:11:10+5:302023-11-20T10:11:53+5:30

'किंग कोहली'ची क्वीन बायको! वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला अनुष्काने 'असा' दिला आधार, स्टेडियममधील फोटो व्हायरल

world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final | निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केल्यानंतर लाखो क्रिकेटप्रेमींचं हृदय तुटलं. रविवारी(१९ नोव्हेंबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कांगारुंनी भारताचा पराभव केला. त्यामुळे भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्डकपचाअंतिम सामना हरल्यानंतर भारतीय खेळाडूंना मैदानातच अश्रू अनावर झाले. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीदेखील निराश होऊन परतताना दिसला. 

भारताने वर्ल्डकपचा सामना हरल्यानंतर हताश झालेल्या विराटला त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आधार देताना दिसली. अनुष्का आणि विराटचा सामन्यानंतरचा स्टेडियममधील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराटने एकमेकांना मिठी मारल्याचं दिसत आहे. अनुष्का विराटचं सांत्वन करत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो पाहून अनुष्काचं सर्वत्र कौतुक होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

एकाने कमेंट करत "हम साथ साथ है" असं लिहिलं आहे. तर दुसऱ्याने "अनुष्का ज्याप्रकारे विराटला पाठिंबा देत आहे, त्यामुळे तिने मनं जिंकली आहेत," अशी कमेंट केली आहे.  "प्रत्येकाला अनुष्कासारखी सुखात आणि दु:खात साथ देणारी लाइफ पार्टनर हवी असते. विराट कोहली लकी आहे", असं म्हणत अनुष्काचं कौतुक होत आहे. 

संपूर्ण विश्वचषकात कोहलीने विराट कामगिरी केली. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने ५४ धावा केल्या. सेमी फायनलमध्ये विराटने वनडेमधील त्याचं ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तर ७६५ धावा करत विराट वर्ल्डकपमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. 
 

Web Title: world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final