​सूरजचे करिअर लागेल का मार्गी??

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 19:59 IST2016-07-23T14:29:16+5:302016-07-23T19:59:16+5:30

सूरज पांचोली याचा ‘हिरो’ हा पहिला वहिला चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला. (प्रेक्षकांना ‘हिरो’च काय तर ‘हिरो’तील ‘हिरो’ही आवडला नाही.) त्यानंतर ...

Will Suraj's Career Need? | ​सूरजचे करिअर लागेल का मार्गी??

​सूरजचे करिअर लागेल का मार्गी??

रज पांचोली याचा ‘हिरो’ हा पहिला वहिला चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला. (प्रेक्षकांना ‘हिरो’च काय तर ‘हिरो’तील ‘हिरो’ही आवडला नाही.) त्यानंतर सूरजच्या करिअरला जणू काहीसा बे्रकच लागला. पण फायनली, सूरजच्या करिअरला गती मिळण्याची शक्यता आहे.  होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चा यशस्वी झालीच तर फरहान अख्तरच्या नव्या चित्रपटात सूरज दिसेल. सध्या सूरजसोबत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पण तूर्तास तरी सूरजने हा चित्रपट साईन केलेला नाही. सूरज सध्या रेमो डिसूजाच्या अपकमिंग चित्रपटासाठी तयारी करतोय. या चित्रपटात सूरज अजय देवगणसोबत दिसणार आहे. रेमोने या चित्रपटाच्या डेट्स अद्याप दिलेल्या नाहीत. त्या आल्या आणि डेट्स मॅच झाल्या तर कदाचित सूरज फरहानचा नवा चित्रपट साईन करेल..वेल,  करिअरच्या या टप्प्यावर एवढा मोठा चित्रपट नाकारणे योग्य ठरणार नाही, हे सूरजपेक्षा अधिक कोण समजू शकेल...होय ना??

Web Title: Will Suraj's Career Need?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.